वाचा तीन आठवड्यात कुठे झाला 220 मुलांचा मृत्यू
नागरिकांचं असं म्हणणं आहे, की न्यूमोनियामुळे हे मृत्यू होत आहेत. पाकिस्तानात सध्या कडाक्याची थंडी पडत असून, त्यामुळे मुलांना न्यूमोनिया होत असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानातल्या काळजीवाहू सरकारनेही ही बाब मान्य केली आहे.
सध्या पाकिस्तानात कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे न्यूमोनियाच्या पेशंट्सच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एकट्या लाहोरमध्येच न्यूमोनियामुळे 47 जणांचे मृत्यू झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच एक जानेवारी 2024पासून पाकिस्तानात आतापर्यंत सुमारे साडेदहा हजार जणांना न्यूमोनिया झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हे निश्चितच चिंताजनक आहे.
न्यूमोनियामुळे सातत्याने होत असलेल्या मृत्यूंमुळे पाकिस्तान सरकारपुढे असलेली आव्हानं वाढत चालली आहेत. गेल्या वर्षीही पाकिस्तानात न्यूमोनियामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी नव्हती. गेल्या वर्षी 990 पाकिस्तानी नागरिकांचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला होता. नागरिकांनी आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, मुलांना ऊबदार कपडे घालायला द्यावेत, असं आवाहन सरकारने नागरिकांना केलं आहे.