प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात एनसीसी छात्र सैनिकांनी केले उत्कृष्ट पथसंचलन

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालयातील एनसीसी युनिट मधील छात्र सैनिकांनी तसेच स्टुडंट पोलीस कॅडेट यांनी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी गांधी विद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये प्राचार्य विश्वेश्वर पायले यांनी , त्यानंतर नगरपरिषद आर्वी मुख्याधिकारी डॉ . किरण सुकळवाड यांनी ध्वजारोहण केले. नंतर गांधी चौकामध्ये सुद्धा माजी शिक्षकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यक्रम तालुका क्रीडा संकुल आर्वी येथे माननीय उपविभागीय अधिकारी श्री विश्वास शिरसाट, मां .तहसीलदार ,आमदार दादारावजी केचे , उप मुख्यमंत्री यांचे स्विय सहायक सुमित भाऊ वानखेडे ,डॉक्टर अरुण पावडे गटविकास अधिकारी मरसकोल्हे मॅडम, गटशिक्षणाधिकारी पारडे ,एन सी सी अधिकारी प्रमोद नागरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एनसीसी पायलट कु. श्रेया दुबे ,कु. सई नागरे, सुजल चव्हाण ,निशांत जोध यांनी मान्यवरांना ध्वजस्थळी आणले तसेच परेड निरीक्षण केल्यानंतर पोलिसांचे पथक, होमगार्ड पथक, एनसीसी पथक ,स्टुडन्ट पोलीस कॅडेट पथक, कन्नमवार विद्यालयातील एमसीसी चे विद्यार्थी यांच्या तर्फे मान्यवरांना मानवंदना देण्यात आली आणि अतिशय उत्साहाने प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न झाला.