सामाजिक

वृत्तपत्रातली बातमी वाचून झोपडपट्टीतील राहणाऱ्यां चिमुकल्यांची पुणे येथील.. सामाजिक संस्थेने घेतली दखल

Spread the love

 

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : काही माणसे फार वेगळी असतात समाजात राहत असताना गरजू गरिबांना कशी मदत करता येईल! याची जाणीव ठेवून ते सतत कार्यरत असतात हीच त्यांची जाणीव इतरांना प्रेरणा देणारे ठरते
आणि असेच झाले..

माझ्या घरी ही दिवाळी ; कधी संपणार काळोख इथला?

… लोकमत वर्धा पानावर प्रसिद्ध झालेली ही बातमी पुणे येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ अशोक महाजन सर यांनी वाचली

खरंतर डॉक्टर अशोक महाजन सर हे प्रॉपर वर्धा चे.. परंतु व्यवसाय आणि इतर कार्यासाठी ते पुण्याला स्थायिक झाले मात्र त्यांना वर्धेचा लळा…. दररोज ते लोकमत हॅलो वर्धेच्या बातम्या आवर्जून वाचतात
आणि राजेश सोळंकी आर्वी यांची ही . अशी बातमी वाचून पाल बाधून या थंडीच्या दिवसात उघड्यावर कुडकुडत राहणाऱ्यां चिमुकल्यांची त्यांनी दखल घेतली
त्यांनी vjm सामाजिक संस्थेचे डॉ अशोक हिवंज वर्धा यांचेशी संपर्क साधून चर्चा केली आणि या थंडीच्या दिवसात कुडकुडणाऱ्या चिमुकल्या साठी मायेची उब म्हणून त्यांनी ऊनी स्वेटरची व्यवस्था करून दिली मात्र हे करताना माझे नाव येऊ देऊ नका असे आवर्जून सांगितले ( परंतु याची दखल कोठे ना कोठे घ्यावीच लागणार हे महत्त्वाचे! कारण त्यांचा हा उपक्रम पाहून इतरांनाही अशी जाग येईल प्रेरणा मिळेल हीच अपेक्षा म्हणून त्यांचे नाव टाकण्यात आले)

यासंदर्भात डॉक्टर अशोक हिवंज यांनी प्राध्यापक राजेश सोळंकी यांच्याशी संपर्क साधला आणि या थंडीत कुड कुडणाऱ्या मुलांसाठी मायेची ऊब पुण्यावरून आली आहे त्यांना स्वेटर वितरित करायचे आहे असे सांगितले

डॉ. .अशोक हिवंज.. वर्धा यांनी हे स्वेटर वृत्तपत्रातली बातमी वाचून प्रकाशित केलेल्या आर्वी ता. प्रतिनिधी राजेश सोळंकी यांना दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केला असता गार थंडीचे दिवस असल्याने त्यांनी कोणताही विलंब न करता आपले सामाजिक दायित्व समजून सामाजिक कार्यकर्ते पंकज गोडबोले व प्राध्यापक डॉ विजया मुळे यांना सोबत घेऊन Vjm सामाजिक संस्थेने पुण्यावरून पाठवलेले स्वेटर डॉ. हिवांज सर . यांच्याकडून वर्धेवरून ते स्वेटर आणले
व आर्वी देऊरवाडा रोड बेघर भटकी जमात झोपडपट्टी, शिलाराम जवळ असलेले पाल टाकून असलेले भटकी जमात झोपडपट्टी, व तळेगावला
पाल बांधून राहणारे भटके विमुक्त जमाती व झोपडपट्टीतील वास्तव्य असणारे हातावर कमावून पानावर खाणाऱ्या अतिशय गरजूवंत झोपडपट्टीतील वास्तव्य असलेल्या लोकांनचा शोध घेऊन थेट संपर्क करून स्वेटर स्वतःच्या हाताने घालून चिमुकल्यांना सुपूर्द केले. यावेळी चिमुकल्यांचा आनंद गगनात मावे नासा झालां

स्वेटर वितरण करीत असताना
सामाजिक कार्यकर्त्या प्रा .डॉक्टर विजया मुळे सामाजिक कार्यकर्ते पंकज गोडबोले प्रा. डॉ.सुधाकर भुयार प्रा. डॉ. अनिल दहाट सामाजिक कार्यकर्ते अविनाश टाके सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर आसोले प्रामुख्याने उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close