न.प.शाळा क्रमांक 2, घाटी- घाटंजी येथील विद्यार्थ्यांनी न्यायमंदिराला दीली भेट
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
दिनांक 20 जानेवारी 2024 ला नगर परिषद शाळा क्रमांक 2 घाटी येथील विद्यार्थ्यांनी सहशालेय उपक्रमांतर्गत घाटंजी येथील न्याय मंदिराला भेट दिली. या भेटीदरम्यान न्यायाधीश माननीय श्री. उत्पात साहेब यांनी विद्यार्थ्यांना स्वतः न्यायालयामध्ये चालणाऱ्या खटल्यांबाबत सर्व कायदेविषयक बाबी व इतर सुविधांची माहिती दिली. त्यांनी किशोरवयीन विद्यार्थिनींना पोक्सो कायदा व बाल लैंगिक अत्याचाराबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी वयाचे अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत वाहन चालू नये असे सांगितले. तेथील इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना न्यायालयातर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.
या भेटीदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण पडलवार ,ज्येष्ठ शिक्षक संजय गोलर ,वसंत सीडाम,कृष्णा मडावी,तुषार बोबडे , नरेंद्र राठोड,ज्येष्ठ शिक्षिका वेणूताई मेश्राम ,वृषाली अवचित,ममता गिनगुले हे उपस्थित होते.