बेलोरा ग्राम जलजिवण योजनेचे काम संथगतीने
गावक-यात काम पुर्णत्वास जाण्याबाबत शंका.
घाटंजी तालुका प्रतिनीधी-सचिन कर्णेवार
बेलोरा गटग्राम पंचायत अंतर्गत येणा-या बेलोरा या गावातिल जलजिवन मिशण अंतर्गत सुरु असलेल्या पाणिपुरवठा काम बंद असून गेल्या २०२२/२३ या वर्षात सुरु झालेले काम गावा लगतच्या विहीरी पासून पाइपलाइन करत गावात पुर्णत्वास अजुन आले नाही.पाणी टाकीचे काम पण पुर्णत्वास नाही व काम बंद आहे. मागिल उन्हाळा पाणिटंचाई बघता बेलोरा गावातील जलजिवण योजनेला वेग यायला हवा होता उलट १८ महीन्यात काम पुर्णत्वास जावे हे अस्ताना ही आज रोजी पर्यंत पाणीयोजना काम झाले नाही.सदर कामाबाबत ठेकेदारास विचारणा केली असता उड़वा उडविची उतरते दील्या जात असल्याचे बेलोरा ग्राम पंचायत उपसरपंच मुज्जु पटेल, सदस्य बबलू बरेवार,नरेश मंगाम व सचिव ठाकरे,ग्रामवासि यांचे कडून सांगण्यात आले असून ठेकेदार मनमानीपूर्ण काम करत असून केवळ थातुरमात काम दाखवून माया गोळा करत असल्याने काम पुर्णत्वास जाणार का नाही? ही शंका गावक-यात निर्माण झाली आहे. वरिष्ठाकडून कामाची पाहणी व्हावी व काम पुर्णत्वास ण्यावे ही मांगणी आता गावक-याकडून होत आहे.