क्राइम
पत्नीची नकार घंटा , पतीचा संताप आणि हैवान पतीची कौर्याची परिसीमा
हैदराबाद / प्रतिनिधी
तो पत्नी कडे सतत पैशाची मागणी करीत होता. पण पत्नी सतत नकार घंटा वाजवत होती. त्यामुळे पती इतका संतापला की प्रथम त्याने तिच्या गळ्यात कात्री (कैची ) खुपसली.त्यावर त्याचे समाधान झाले नाही तर तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केले . त्यानंतर तो पळून जाण्याचा तयारीत होता पण पकडल्या गेला.
इम्रान उल हक असे त्या हैवान पतीचे नाव आहे. इम्रान उल-हक असं या गुन्हेगाराचं नाव आहे. इम्रान आपल्या पत्नीला अत्यंत वाईट पद्धतीने वागवत असे. त्याने कार खरेदी करण्यासाठी तिच्याकडे 30,000 रुपये मागितले होते. सततची भांडणं आणि पत्नी पैसे देत नाही या कारणांमुळे तो वैतागलेला होता. त्यामुळे तो थेट आपल्या पत्नीला संपवण्याचा कट रचू लागला. तिला संपवण्याचा कट रचत असला तरी दुसरीकडे तो तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्नही करत होताच. पत्नी मात्र त्याला पैसे देण्याच्या बाबतीत आपल्या नकारावर ठाम होती. तिचा हा नकार त्याला पचवता येत नव्हता. त्यामुळे सहा जानेवारी ला त्याने पैसे मागायचा शेवटचा प्रयत्न केला. पत्नीने परत एकदा नकार दिल्यानंतर इम्रानच्या संतापाचा कडेलोट झाला.
इम्रानने सहा जानेवारीला रात्री पत्नीच्या गळ्यात कात्री खुपसली. त्यानंतर हातोड्याने त्याने आपल्या पत्नीच्या डोक्यावर वार केले. पत्नीचा मृत्यू झालाय अशी शंका आली तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण ते करण्याआधी त्याने तिच्या गुप्तांगालाही इजा केली.
महिलेच्या कुटुंबाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आयपीसीच्या कलम 302 खाली इम्रानवर गुन्हा दाखल केला. त्याला अटक करताना काही अडचण आली नाही मात्र चौकशीमध्ये त्याने कुठलंही सहकार्य केलं नाही शिवाय आपण असं कृत्य केलंच नसल्याचं तो म्हणत राहिला. असं असलं तरी घटनास्थळावरचे पुरावे त्याने केलेला गुन्हा सरळसरळ उघड करणारेच होते. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करुन चौकशी केली असता इम्रानने गुन्ह्याची कबुली दिली.
सध्या या प्रकरणातील आरोपी असलेला नवरा तुरुंगाची हवा खात आहे. ज्या बायकोबरोबर आयुष्यातली सगळी सुखदुःख वाटून घ्यायची तिच्याशी वागताना त्याने अमानुषपणाची परिसीमा गाठली आहे. हे प्रकरण ऐकून न्यायालयानेही आरोपीवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढलेत आणि त्याला तुरुंगात टाकलंय. शिवाय 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावलाय. सदर आरोपी 38 वर्षांचा आहे