ब्रेकिंग न्यूज

दोन मजली इमारतीचे झुला टॉवर कोसळल्याने युवक ठार

Spread the love
जवाहरनगर  (सागर बागडे) 
           दोन मजली इमारतीचे झुला टॉवर तुटल्याने एका ३० वर्षीय युवकाचा दुर्दैवी घटना घडली आहे.शुभम रमेश पेलणे वय ३० वर्ष रां.सावरी असे त्याचे नाव असून त्याचा इलेक्ट्रिक समान दुरुस्तीचा व्यवसाय होता. घटना सकाळी ९.२५ वा. घडली.
आज सकाळी ९.२५ वाजता आंबेडकर वॉर्ड, बुद्ध विहार सावरी  जवळील भिमराव  गोविंदा लाडे यांचे दोन मंजिली इमारतीच्या वरील  टॉवर वरील झुला असलेले ८ बाय ८ चे  चे पक्के काँक्रिट चे टॉवर ड्रिल मशीन द्वारे तोडण्याचे काम शुभम यांनी घेतले होते ते काम करताना तीन पक्के कॉलम तोडून झाल्यावर चौथा कॉलम तोडताना  टॉवर चा स्लॅब चा थर शुभम च्या अंगावर पडून त्या खाली दबल्या गेल्याने जागीच मृत पावला .या वेळी घटना स्थळी शुभम हा एकटाच होता .
घटनेची माहिती होताच नागरिकांची  मदती करिता  रीघ लागल्या होत्या.
घटना स्थळी ठाणेदार सुधिर बोरकुटे, पोलिस पाटील गोविंदा कुरंजेकर सरपंच गिरीश ठवकर समक्ष घटनेचा पंचनामा करण्यात येऊन शव विच्छेदन करण्यासाठी  भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close