अन्यायकारक हिट अँड रन कायद्या विरोधात ५ दिवसीय “स्टेयरिंग छोडो” आंदोलनाची सांगता!
नागपूर जिल्हाधिकाऱ्यां मार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर!
वाडी (प्र) : केंद्रातील मोदी सरकारने नुकताच लागू केलेला हिट अँड रन विरोधी कायदा ३,४ पेक्षा जास्त चाके असलेल्या सर्व वाहनांच्या चालकांवर अन्यायकारक ठरणारा आहे.या विरोधात नुकतेच काही दिवसा आधी या कायद्या विरोधात वाहन चालकांनी अचानक स्टेरिंग छोडो आंदोलन केले.दबाव वाढता बघून केंद्र सरकारने या कायद्याला स्थगिती दिली आहे.परंतु केंद्रातील मोदी सरकारची कार्यप्रणाली पाहून त्यावर विश्वास करणे योग्य वाटत नसल्याने भविष्यात हा कायदा लागू होऊ शकते या भीतीला पाहता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाडीत वाहन चालकांच्या वतीने ५ दिवसीयस “स्टेरिंग छोडो” आंदोलन करण्यात आले. व भविष्यात या अन्याकारक कायद्या विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन साठी सर्व वाहन चालकांना तयार राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष व आयोजक मनीष बोरकर यांनी आंदोलन मंडपात समापन प्रसंगी व्यक्त केले.
या पाच दिवसीय हितेंद्र अन्यायकारक कायदे विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला ५०० पेक्षा अधिक वाहन चालकांनी भेट देऊन सहभाग व समर्थन घोषित केले.यासह निषेध नारे लावून काळे झेंडेही दाखवले. गुरुवारी आंदोलनाचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने आंदोलनकर्त्या वाहन चालकांनी केंद्र सरकारच्या विरोधात हातात काळे झेंडे घेऊन नारेबाजी केली.तर दुपारी दुचाकी वाहनाने झेंडे घेऊन संविधान चौकात पोहोचले.येथे केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.
आंदोलनकर्ते नुसार कोणत्याही वाहन चालकाला त्याच्या हातून अपघात व्हावा असे वाटत नाही. अपघाताचे अनेक कारण होऊ शकतात परंतु अपघात होताच नागरिक अपघात स्थळी मोठ्या संख्येने जमा होतात व कोणतीही तपासणी न करता मोठ्या वाहननाच्या चालकाला दोषी समजून मारणे सुरू करतात व गाडीची तोडफोड करतात. अशा स्थितीत चालक आपला जीव वाचवेल की जखमीला रुग्णालयात नेईल पोलिसांना सूचना कशी देईल सरकारचा दंड,सजा कशी राहील इत्यादी चे उत्तर केंद्र सरकारने दिलेले नाही.
या नेत्यांच्या मार्गदर्शनानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी मनिष बोरकर च्या नेतृत्वात विनय उमाटे,पडघम,विश्वजीत मेश्राम, निलेश बोराडे
सचिन बोकडे, राहुल कोंबे, दिलीप बगडते, नागेश बोरकर ,सियाराम चंद्रवंशी, किशोर मेश्राम ,विलास ढोके ,संजय राऊत ,रंजीत बगडते ,बबनराव गोपाळे ,मनोज कांबळे, नरेंद्र महल्ले, भोजराज नंदागवळी ,जितू बागडे ,राजू वैद्य ,संदीप मेश्राम, भूषण सोमकुवर, रमेश भंडारकर ,अनिल प्रभू दास, राऊत ,प्रताप चोखांद्रे, रामपाल मन्नासे पुलीस के संरक्षण मे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय पहूचे तथा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नाम प्रेषित एक निवेदन जिल्हाधिकारी नागपूर को सौपा तथा यह अन्यायकारक कानून रद्द करणे की मांग अनिल सूर्यवंशी,नागेश बोरकर ज्ञानेश्वर माने, सिराज शहा, राकेश यादव, संदीप पालेवार राहुल कोंबे, कैलास बावणे, सुधीर राऊत, नरेशजी चोपडे, संतोष पाल, रणजीत गुलाबरावजी बगडते,विनोद मानकर, दीपक मानकर, दिलीप बगडते, बबनरावजी गोपाळे, शैलेश ऋषेश्वरी, तुकाराम काचोरे, अजय कातुरे, उमेश तिरपुडे, पांडुरंग ठाकरे, फारुख भाई, कुरेशी, रविभाऊ भीमटे, गौतम सोनपिपडे,योगेंद्रसिंग परिहार, नरेंद्र महल्ले विक्रम विजयकर आदी शामिल हुये थे.पुलीस संरक्षणात नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी च्या नावे प्रेषित एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.व हा अन्यायकारक कायदा रद्द करणे ची मागणी केली. आता हे बघावे लागेल ते सरकार हा कायदा रद्द करते की यात सुधारणा करते.