नॉयलॉन मांजा वापरु नका,,! वाडी नप. व पोलिस पथका तर्फे जनजागृती,!
नप. कर्मचारी व वाडी पोलिसांची निगराणी,
वाडी(प्र):मकरसंक्रांतीच्या पारंपरिक सणाच्या निमित्ताने लहान मुले व युवकांमध्ये पतंग उडविण्याला उधाण येत असते,यामध्ये युवक पतंग उडविताना नॉयलॉन मांजा वापरतात मात्र हा मांजा मानवी शरीर,पशु-पक्षी व वाहन चालकांच्या जीवावर बेतू शकते,त्यामुळे नॉयलॉन मांजा वापरू नये यासाठी वाडी नगर परिषद वाडी पोलीस विभागातर्फे संपूर्ण परिसरात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
पशुपक्षी व मानवी जीवावर बेतनाऱ्या नॉयलॉन मांज्यावर शासनाच्या व आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्देशानुसार बंदी असल्याने असल्याने परिसरातील पतंग विक्रेते लपून छपून नॉयलॉन मांजा विक्री ला ठेवतात त्यामुळे लहान मुले व युवक साध्या धाग्यापेक्षा नॉयलॉन मांजाला प्राधान्य देतात.यासाठी वाडी नगर परिषद चे मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख व वाडी पोलीस ठाण्याचे पोनि.प्रदीप रायांनावर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे विशेष तपासणी पथक तयार करून प्रत्येक पतंग विक्रेत्यांच्या दुकानाची तपासणी करून नॉयलॉन मांजावर बंदी च्या सूचना देण्यात आल्या, सोबतच पतंग खरेदी करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करून नॉयलॉन मांजा वापरण्यापासून परावृत्त करण्यात येत आहे.विशेष तपासणी व जनजागृती पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक विजय धूमाळ,राजेंद्र वानखेडे, वाडी नप.स्वच्छता अभियानचे ब्रॅण्ड एम्बेसिडर नरेशकुमार चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते सचिन मेश्राम यांनी परिसरातील खेळांचे मैदान व दुकानाला भेटी देऊन पतंग शौकीन युवकांमध्ये नुकसान दायक मांज्याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले.