मनसे कडून संक्रांतीनिमित्त मोफत पतंग वाटप कार्यक्रम
मनसे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बावणे यांचे आयोजन
अमरावती / प्रतिनिधी
मकर संक्रांति सणानिमित्त मनसे जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ बावणेर यांच्याकडून लहान मुलांकरिता पतंग वाटप कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये परिसरातील सर्व लहान मुलांनी अगदी उत्साहांमध्ये पतंग मिळवण्यासाठी गर्दी केली होती, पतंग मिळाल्यानंतरचा आनंद प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर पाहण्यासारखा होता, परिसरातील प्रत्येक वयाच्या नागरिकांनी आपल्या मुलांना पतंग मिळावा याकरिता मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
यावेळेस शहर संघटक बबलू आठवले शहराध्यक्ष हर्षल ठाकरे कामगार सेना चिटणीस विकी थेटे, शहराध्यक्ष धीरज तायडे शहराध्यक्ष गौरव बांते, उपाध्यक्ष मयंक तांबुसकर प्रसिद्धी प्रमुख पवन सावरकर राज्य कार्यकारणी सदस्य सुशील पाचघरे शहर उपाध्यक्ष पवन लेंडे विभाग अध्यक्ष अमर महाजन मनीष भाऊ डहाके शिवा डोंगरे प्रसन्न मार्कंडे निलेश कटरमन चित्तरंजन मेश्राम श्रीकांत कराडकर गौरव अजूबे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते…