शेतकऱ्यांची बिकट वाट नितीन कदम करणार सुकर ….
पांदन रस्त्याच्या कामाला येणार गती.
अमरावती / प्रतिनिधी
*स्थानिक बडनेरा विधानसभा क्षेत्रातील गेल्या १५ वर्षापासून प्रलंबित असलेल्या पांदन रस्त्याच्या दुर्व्यावस्थेवर नितीन कदम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने हिरवा कंदील देतं जलद गतीने कार्य करण्याची ग्वाही दिली.दिड दशकापासून १५ कोटी ६० लक्ष रुपये किमतीच्या प्रलंबित पांदन रस्त्याच्या निधी अडकून पडला असतांना नितीन कदम यांच्या ही बाब लक्षात आली असता गेल्या वर्षभरापासून नितीन कदम हे दस्तऐवज व इतर गोष्टींवर भर देत होते.*
*बडनेरा ग्रामीण भागातील भातकुली तालुक्यातील शेतीला जोडणाऱ्या रस्त्यांना मुहूर्त कधी मिळेल अशी भावना शेतकरी बांधवांमध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. अलीकडेच जगाच्या पाठीवर भारतात अति जलद गतीने रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे अगदीच पूर्वांचल सारख्या भागात वाडा,वस्ती सीमा वरती भागात रस्त्यांचे जाळ विणल गेल आहे भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो, आणि त्याच कृषी प्रधान देशात शेतीला जोडणाऱ्या रस्ते अद्यापही भातकुली तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी व्यवस्थित नाही असे दिसून येते. पावसाळा लागल्यानंतर शेतीची अनेक कामे शेतकरी करत असतात शेतीत बी बियाणे खते औषधे फवारण्या अशी सर्व वस्तू शेतात निर्माण करण्यासाठी शेतकरी आपल्या बैल जोडीचा उपयोग करतात परंतु बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी जायला रस्ते नाही आहेत, शेतमाल काढणी पश्चात शेतमालाला घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे कसरत करावी लागते सर्वसामान्य शेतकऱ्यांची राज्य सरकारकडून मापक अशी अपेक्षा आहे की शेतीला जोडणारे रस्ते लवकरात लवकर तयार करून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा या भागात सर्वात जास्त शेतकरी वर्ग हा बडनेरा ग्रामीण भागात आहे .ग्रामीण भागाला जोडणारी रस्ते तयार झालेत परंतु शेतीला जोडणाऱ्या रस्त्यांचा मुहूर्त कधी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला होता. परंतु नितीन कदम यांच्या सततच्या पाठ्यपुराव्यामुळे पांदण रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागतांना दिसून येत आहे.*