डवले पब्लिक स्कूल अँड कॉलेजचा सांस्कृतिक सोहळा जल्लोषात
अकोला / प्रतिनिधी
स्थानिक डवले पब्लिक स्कूल अँड कॉलेजचा वार्षिक सांस्कृतिक सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा सांस्कृतिक, क्रीडा ,संगणक ,स्पर्धा परीक्षा यामध्ये सहभाग होता .याप्रसंगी आ.किरण सरनाईक यांनी असे प्रतिपादन केले की प्रत्येक विद्यार्थी विकसित होईल हेच प्रत्येक शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट असले पाहिजे गेल्या वीस वर्षांत डवले शिक्षण संस्थेची प्रगती उल्लेखनीय आहे. याप्रसंगी आ. नितीन देशमुख यांनी असे प्रतिपादन केले सामान्य व्यक्ती, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे कार्य हे डवले पब्लिक स्कूल व कॉलेजच्या माध्यमातून होत आहे. केवळ भरमसाठ फी हा उद्देश न ठेवता सामान्य मुलांची शिक्षण सुद्धा झाले पाहिजे हाच या संस्थेचा उद्देश आहे ही आनंदाची बाब आहे. अकोल्याचे शिक्षणाधिकारी डॉ. सौ सुचिताताई पाटेकर यांनी शिक्षणासोबत सर्वांगीण विकास हे संस्थेचे उद्दिष्ट असले पाहिजे, केवळ पुस्तकी ज्ञान न देता सर्व क्षेत्रात प्रगती असली पाहिजे असे त्यांनी सांगितले. पंजाबराव देशमुख विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुधीर राठोड यांनी डवले शिक्षण संस्थेच्या कार्यावर समाधान व्यक्त केले याप्रसंगी जीवन गौरव पुरस्कार डवले एज्युकेशन सोसायटी व मानव सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.आमदार गोवर्धनजी शर्मा ,आ.किरण सरनाईक, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, मा. विजय ठोकळ ,मा. गिरीधरराव बोरखडे ,डॉ.सुधीर राठोड याप्रसंगी असंख्य विद्यार्थी पालक उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष प्रकाश डवले सर, सचिव सौ.मृणालिनी डवले मॅडम यांनी केले.डवले पब्लिक स्कूल अँड कॉलेजची सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अर्थक परिश्रमातून हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.