डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना कार्यकारिणी जाहीर.
मुंबई (विशेष प्रतिनिधी )
डिजिटल मिडिया भविष्यकाळात प्रसार माध्यमांचे मुख्यकाम करणार आहे. समाज माध्यमांवर डिजिटल मिडियाचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे यामुळे डिजिटल मिडियाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच पत्रकार क्षैत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांची डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य यांची कार्यकारणी सभा 3 जानेवारी 2024 रोजी मालाड मुंबई येथे घेण्यात आली ही सभा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी गेल्या वर्षी या संघटनेच्या झालेल्या पहिल्या अधिवेशनाचा मागवा घेताना ते म्हणाले की डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही राज्यात कोविड काळात सुरू झाली देशातली सोशल मीडियातील पहिली संघटना असून याचे पहिले अधिवेशन पुस्तकाचे गाव म्हणून जागतिक पातळीवर कीर्ती असलेल्या महाबळेश्वर मधील भिलार या गावात झाले होते त्या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभासी स्वरूपात केले होते त्या अधिवेशनाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर स्वागताध्यक्ष म्हणून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे आणि खासदार श्रीनिवास पाटील त्याचबरोबर राज्याच्या नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर इत्यादी मान्यवर मंडळी त्या अधिवेशनाला उपस्थित होते तसेच राज्यातले जवळ जवळ 2000 यूट्यूब चैनल पोर्टल आणि डिजिटल माध्यमातून प्लॅटफॉर्मचे पत्रकारही सहभागी झाले होते यावर्षी या संघटनेचे दुसरे अधिवेशन 28 जानेवारी आणि 29 जानेवारीला कोल्हापुरात सिद्धगिरी कनेरी मठ येथे आयोजित करण्यात आले आहे त्या दोन दिवसाच्या होणाऱ्या अधिवेशनाच्या निमित्ताने एकूण डिजिटल मीडियाचे प्रश्न डिजिटल मीडियाची वाटचाल केंद्र व राज्य सरकारची डिजिटल मीडिया संदर्भात असलेली भूमिका आणि एकूणच डिजिटल पत्रकारांमध्ये असलेले संभ्रम दूर करण्यासाठी म्हणून हे अधिवेशन आयोजित केले आहे व त्याच अनुषंगाने मलाड मुंबईतील पत्रकारांची बैठक बोलावली होती असेही त्याने प्रतिपादन केले मुंबई विभागाचे अध्यक्ष संजय मंगेश भैरे यांची मुंबई विभागीय अध्यक्ष म्हणून नव्याने निवड केली असल्याचे ते पुढे म्हणाले त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ठाणे पालघर या मुंबई विभागात कशा पद्धतीने संघटना वाढवता येईल डिजिटल माध्यमातून काम करणाऱ्या अगदी फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर पासून कॉपीरायटर पर्यंत प्रत्येकाला कशा पद्धतीने पुढे जाण्यासाठी मदत करता येईल दिशा देता येईल यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत असेही ते यावेळी म्हणाले राज्य सरकारला या संघटने कडून विनंती केली होती की राज्यातल्या डिजिटल मीडिया शासकीय मान्यता देऊन यादीवर घ्यावे त्यांना शासकीय जाहिराती द्याव्यात त्या अनुषंगाने देखील राज्य शासनाचा तो अहवाल अंतिम टप्प्यात आहे आणि राज्यात देखील डिजिटल माध्यमातून नोंदणी असेल जाहिराती देणे असेल किंवा पत्रकार म्हणून मान्यता देणे असेल यासंदर्भात धोरण लवकरच जाहीर होईल त्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत आपण केलेल्या प्रयत्नाला यश म्हणून यापूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडिया रेडिओ मीडिया आणि डिजिटल मीडिया यात काम करणाऱ्या कर्मचारी पत्रकार टेक्निशियन हे नक्की कोण हा प्रश्न घेता तर त्यांना देखील म्हणजेच श्रमिक पत्रकारांना कायदेशीर कक्षेत घेण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आपल्या पाठपुराव्याला हे खूप मोठे यश आले असे मी मानतो असेही त्यांनी सांगितले दरम्यान डिजिटल क्षेत्रातील देशातील पहिली संघटना म्हणून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना नावा रूपाला आली आहे आणि निश्चित पणाने डिजिटल मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या हिताचे काम करत असताना पत्रकारितेची मूल्य रुजवण्याचे काम आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत असं अभिमानांस्पद उद्गार राजा माने यांनी याप्रसंगी काढले डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मुंबईतील मलाड येथे झालेल्या कार्यकारणी सभेला संघटनेचे मुंबई अध्यक्ष संजय भैरे याचे राजा माने यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सचिन सावंत उपाध्यक्ष, सुचिता पाटील सरचिटणीस, सचिव पंडित मोहिते पाटील, सुरेंद्र खानविलकर कोषाध्यक्ष, देवेंद्र खन्ना सहकोषाध्यक्ष उदय नरे मराठी मुख्य प्रवक्ता, विधानसभा अध्यक्ष वर्सोवा कविता बत्रा यांचीही नियुक्ती राजा माने यांच्या हस्ते करण्यात आली.