22 जानेवारी रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मंत्री महोदयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
मुंबई (विशेष प्रतिनिधी )
सार्या देशाचे लक्ष अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीच्या ऐतिहासिक कार्यक्रमाकडे लागले आहे.
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्री राम लल्लांची प्राणप्रतिष्ठापना, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. प्रभू श्रीराम हे अवघ्या भारत देशाचे आराध्य आहेत. अयोध्या येथील मंदिर, हे केवळ मंदिर नसून राष्ट्र मंदिर आहे.
त्यामुळे 22 जानेवारी रोजी अयोध्या नगरीत राम लल्लांची प्राणप्रतिष्ठापना होताना महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, ही सकल हिंदू समाजाची मागणी असून, आपण जनतेच्या मागणीनुसार राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, तसेच सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्याच्या सूचना देऊन, सार्वजनिक दिपोत्सवासाठी परवानगी द्यावी अशी विनंती मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.
देशातील या उत्सवाचे साक्षीदार म्हणून उपस्थीत राहण्यासाठी व आपल्या घरोघरी दीपोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांना आनंद घेण्यासाठी शाळा, महाविद्यालये व आस्थापनांना जाहीर सुट्टी करण्यात यावी अशी प्रतिक्रिया कला शिक्षक अभय ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. देशातील लाखो रामभक्तांना प्रत्यक्षात रामजन्मभूमीच्या पवित्र भूमीवर जाता येणे शक्य नाही. प्रभू रामचंद्रांच्या या अनोख्या सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी व दिवाळीदिन साजरा करण्यासाठी विशेष सुट्टीचे प्रायोजन करावे असे आरती शर्मा यांनी व्यक्त केली.