क्राइम

पंचकर्म चिकित्सेच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यसयाचा भांडाफोड

Spread the love

पुणे  / नवप्रहार मीडिया 

                  मागील काही काळापासून लोकांचा पंचकर्म चिकित्सा आणि मसाज कडे कल वाढत चालला आहे.धकाधकीच्या जीवनात थकवा जाणवत असल्याने ताजेतवाने दिसण्यासाठी लोकं मसाज आणि पंचकर्म  चिकित्सा यासारख्या क्रिया करवून घेतात. पण याच सेंटर च्या नावाखाली काही लोक वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे अनेक वेळा झालेल्या करवाईतून उघड झाले आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पंचकर्म चिकित्सेच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा भांडाफोड केला आहे. 

पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर, या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून आरोपी पीडित चार तरुणींकडून वेश्याव्यवसाय  करुन घेत होती.

याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विद्या मदन मंडले (रा. मार्केटयार्ड, पुणे), कौशल्या सहदेव लोंढे (वय-33 रा. वडगाव बु., पुणे) यांच्यावर आयपीसी 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 नुसार गुन्हा दाखल करुन कौशल्या लोंढे हिला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.2) सायंकाळी साडे चारच्या सुमारास बिबवेवाडी येथील शिवांजली पंचकर्म क्लिनिक मसाज सेंटर  येथे केली आहे.

बिबवेवाडी येथील महेश सोसायटीमध्ये असलेल्या शिवांजली पंचकर्म क्लिनिक मसाज सेंटर येथे वेश्याव्यवसायसुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. पंचकर्म मसाज सेंटरच्या नावाखाली
हा वेश्याव्यवसाय सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या घटनेची पुष्टी केली आहे.
त्यानंतर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले. आरोपी चार तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन यातून मिळणाऱ्या पैशांवर स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.
पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक ढमढेरे  करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close