हटके

या कारणाने झोमॅटो बॉय आहे चर्चेत 

Spread the love

            केंद्र सरकारच्या हिट अँड रण कायद्याच्या विरोधात राज्यात ट्रक चालकांचा मागील दोन दिवसांपासून संप असल्याने लोकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या होत्या. आणि पुढे पेट्रोल मिळणार नाही म्हणून गाडीत जास्तीचे पेट्रोल टाकून घेतले होते. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपाचे पेट्रोल खल्लास झाले होते. कित्येक पेट्रोल पंप बंदही झालेले पहायला मिळाले.

या सगळ्यात झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय  चांगलाच चर्चेत आला आहे. याला कारण म्हणजे, तो डिलिव्हरीसाठी चक्क घोड्यावर जात आहे.

या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ हैदराबादच्या चांचलगुडा भागातील असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये तो घोड्यावर डिलिव्हरी करण्याचं कारणही सांगत आहे.

“ऑर्डर घेऊन निघालो, मात्र तीन तास रांगेत थांबूनही पेट्रोल मिळालं नाही..” असं हा डिलिव्हरी बॉय एका व्यक्तीला सांगत आहे. यासोबतच तो व्हिडिओ घेणाऱ्या इतर लोकांनाही हात हलवून अभिवादन करताना दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देखील पहायला मिळत आहेत. ट्रकचालकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी किंवा स्वतःची मार्केटिंग करण्यासाठी झोमॅटोनेच ही शक्कल लढवली असल्याची शक्यता नेटिझन्स व्यक्त करत आहेत. तर, अशा प्रकारे डिलिव्हरी करताना बॉक्समधील जेवण नीट राहिले असेल का? असा प्रश्नही एकाने उपस्थित केला आहे.

ट्रक चालकांचा संप मागे

दरम्यान, नवीन हिट-अँड-रन कायद्याविरोधात असणारा ट्रक चालकांचा संप आता मागे घेण्यात आला आहे. सरकारने या कायद्यावर पुनर्विचार करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. या नवीन कायद्यामध्ये अपघातानंतर ट्रकचालक पळून गेल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि सात लाख रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली होती. याला ट्रकचालकांनी विरोध केला होता.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close