हटके

महिलेला मृत समजून शवपेटीत ठेवले सहा दिवसानंतर घडले असे की  उडाला थरकाप 

Spread the love

बीजिंग  / नवप्रहार मीडिया

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याच्या सग्या सोयऱ्यांना येण्यास वेळ असला की संबंधित व्यक्तीचा मृतदेह शवपेटीत ठेवण्यात येतो. एकटी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असल्याने शेजाऱ्यांनी तिचे शव शवपेटीत ठेवले.सहा दिवसांनी जेव्हा शेजाऱ्यांनी महिलेच्या घरी जाऊन पाहिले त्या वेळी महिलेचे पार्थिव पेटीत नव्हते. घरात पाहिले असता महिला  स्वयंपाक करीत होती. हे पाहून शेजारी पहिले घाबरले. नंतर तिला विचारले असता तिने सांगितले की ती बराच वेळ झोपल्याने तिला भूक लागली होती. म्हणून ती खायला काही तरी करत आहे.

गुआंगशी प्रांतातील राहणारी 95 वर्षांची महिला. ली झ्युफेंग असं तिचं नाव. तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. ती घरात पडली होती. शेजाऱ्यांनी घरी येऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काही उठत नव्हती. मृत्यूनंतर जसं शरीर थंड होतं, तसं तिचं शरीर थंड झालं नव्हतं पण काही केल्या ती उठतही नव्हती. त्यामुळे तिचा झोपेतच मृत्यू झाला, असं शेजाऱ्यांना वाटलं. तिच्या 60 वर्षांच्या शेजाऱ्यानं सांगितलं, त्यांनी महिलेला हलवलं, तिला उटवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती उठली नाही.

महिला एकटीच राहत असल्याने शेजारच्या कुटुंबीयांनीही तिच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली. महिलेचा मृतदेह शवपेटीमध्ये ठेवून काही दिवस तिच्या घरीच ठेवला. जेणेकरून मित्र आणि नातेवाईकांना तिचं अंतिम दर्शन घेता येईल. त्यांनी शवपेटीवर खिळा ठोकला नाही. सुमारे सहा दिवसांनी जेव्हा ते शवपेटी दफन करण्यासाठी आले तेव्हा शवपेटी रिकामी होती. शवपेटीत मृतदेह नव्हता.

मृत झालेली महिला किचनमध्ये होती. स्टुलवर बसून ती स्वयंपाक करत होती. शेजाऱ्यांनाही घाम फुटला. महिला म्हणाली, बराच वेळ झोपल्यानंतर तिला भूक लागली. म्हणून ती किचनमध्ये काहीतरी करण्यासाठी आली.डॉक्टरांनी या प्रकाराला कृत्रिम मृत्यू म्हटलं आहे, ज्यामध्ये शरीरात श्वासोच्छ्वास होत नाही आणि शरीर थंडही होत नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close