घाटंजीत पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
एकता पत्रकार बहूउदेशिय संस्थांच्या पुढाकाराने प्रा.शिवश्री प्रविण देशमुख यांचे व्याख्यान व तेलंगाना आयडल रवि रेला मसराम यांचा संगीतमय गीत गायन कार्यक्रम.*
घाटंजी तालुका प्रतिनिधी –
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अर्थात पत्रकार दिनानिमित्त घाटंजीत दी.6/1/24 रोज शनिवार ला सायंकाळी एकता पत्रकार बहूउदेशिय संस्था 0426 च्या वतीने पोलिस स्टेशन चौक घाटंजी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रा. शिवश्री प्रविण देशमुख यांच्या वाणीतून समाज जागृती व व्यसनमुक्ती सोबत शिवचरित्र व्याख्यान होणार असून या कार्यक्रमाला मुख्य आकर्षण म्हणून तेलंगणा आयडॉल रवि रेला मसराम यांच्या गितगायणाचा सूमधूर संगितमय संच असणार आहे. तसेच या कार्यक्रमाला घाटंजी तालुक्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार असून कार्यक्रमा अंतर्गत समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत व कलागुण संपन्न व्यग्तीचा उपस्थित मान्यवरां हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमास घाटंजी तालुका सहीत इतरही जनतेनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आव्हान एकता पत्रकार बहूउदेशिय संस्थाचे अध्यक्ष कैलास कोरवते, उपाध्यक्ष अरविंद चौधरी, सचिव बंडू तोडसाम,मुख्य सल्लागार गणेश भोयर, अनंत नखाते,संजय ढवळे, व सर्व सदस्य गण एकता पत्रकार बहूउदेशिय संस्था च्या वतीने करण्यात आले आहे.
00000000000