Uncategorized

या कारणाने पोलिसांनी 100 तरुणांना घेतले ताब्यात

Spread the love

ठाणे / नवप्रहार मिडिया

               1 जानेवारी नवीन वर्ष ! 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केल्या जाते. अश्या पार्टीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा  वापर केल्या जातो. आणि  नशेत झिंगाट झालेल्या तरुणांकडून उगाच वाद घातले जातात. यामुळे पोलिसांच्या डोक्यावरील ताण वाढतो. 31 डिसेंबरच्या पार्टीत भांडण तंटे होऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून खबरदारी घेतल्या जाते. ठाण्यात पोलिसांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई केली. घोडबंदर येथे आयोजित करण्यात आलेली रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळून लावली. या पार्टीत अनेक अमली पदार्थही पोलिसांनी जप्त केले आहे.तसेच १०० तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

घोडबंदर येथे एक रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या पार्टीमध्ये विविध अमली पदार्थांचे सेवन केल्या जात असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धाड टाकूत ही पार्टी उधळली असून १०० तरुणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गांजा, चरस, एमडी हे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

मध्यरात्री युनिट पाचचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पार्टी सुरू असतांना पथकाने धाड टाकली. या रेव्ह पार्टीत अनेक तरुण हे मद्यधुंद आणि नशेत असल्याचे आढळले. ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांच्याकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांना पोलिसांनी पंचनामा करून वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नेले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कासारवडवली पोलीस ठाण्यात सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close