ब्रेकिंग न्यूज

घाटात खाजगी बस पलटी ; दोन  महिला प्रवाश्यांचा मृत्यू 

Spread the love
पुणे  /  नवप्रहार मीडिया
                   खाजगी बस च्या चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात बस दरीत कोसळल्याने बसमधील दोन महिला प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये 57 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ताम्हिणी घाटात आज सकाळी पहाटेच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. एक खासगी बस पुण्याहून कोकणाकडे सहलीसाठी निघाली होती. या बसमधून ५७ प्रवासी प्रवास करीत होते. घाटात आल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि क्षणार्धात बस घाटात उलटली . हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ५५ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. कोंडेघर गाव हद्दीतील नागरिकही बचावकार्यास पुढे सरसावले.
दरम्यान, पथक आणि पोलिसांच्या मदतीने अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस उलटली असल्याचे बोलले जात आहे. अपघातातील मृतांची नावे अद्यापही समोरसहलीला निघालेल्या बसचा  अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close