सरत्या वर्षातील पोलीस कार्याचा आढावा
अरविंद वानखडे
यवतमाळ –सन २०२३ चालू वर्षाच्या सन २०२२ च्या तुलनेने जिल्हा पोलीस दलाचे संयुक्तरीत्या यशस्वी कामगिरी केली असून चालू वर्षात सायबर पोलीस ठाणे स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकूण ३२ पोलीस स्टेशन कार्यरत झाले आहे. चालू वर्षी गंभीर गुन्हे या प्रकरणांमध्ये खून खुनाच्या प्रयत्न,दरोडा, जबरीचोरी असे अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. त्यात ७८ खुनाच्या घटनांमधील जवळपास २१७ आरोपी पैकी २१४अटक करण्यात आले. खुणाचा प्रयत्न करणारे गुन्हे ७७ दाखल झाले त्यात सर्व गुन्हे उघडकीस येऊन २०६ आरोपी पैकी १९८ आरोपी अटक केली. दरोडा येथे सर्वच आरोपीवर तात्काळ अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
चालू वर्षात यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण १३ दरोडा गुन्हे दाखल असून ७५ आरोपी यामध्ये अटकेस ७० आहे. त्यासोबत ५९ लक्ष्य मुद्देमाला पैकी ३८ लक्ष ८०हजार रुपयाच्या मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला सन २०२२ यावर्षी ५० टक्के असलेले प्रमाण यावर्षी १०० टक्के गुन्हे उघडकीस आलेली आहे.
जबरी चोरीतील एकूण ८९ घटनांपैकी ६९ घटना या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. असून यामध्ये एकूण ५५ लाखापैकी १५.५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
महिलांच्या गुन्हे संदर्भात जिल्हा पोलीस दलाने यावर्षी अनेक गुन्हे उघडकेस आणले असून एकूण १४८ गुन्हे घडले असून त्यातील १४७ गुन्हे व उघकीस आणण्यात सुद्धा यश आले त्यापैकी एकूण ७८ गुन्हे अल्पवयीन बालिका संबंधित आहे. यामध्ये एकूण १८९ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून त्यातील सर्वच गुन्ह्यांमध्ये वेळेत दोषारोपण सादर करून यातील निवड घटनांमध्ये आरोपींना तात्काळ कठोर शासन व्हावे या उद्देशाने काही केसेस या फास्ट ट्रॅक मध्ये सुद्धा चालविण्यात आल्या. महिलांवरील विनयभंगांचे एकूण ३९७ केसेस उघड ३९६ अटक आरोपी १७७ यामध्ये तात्काळ आरोपींवर कारवाई करून घेण्यात आले तसेच महिला संदर्भात गुन्ह्यांमध्ये आपसी प्रेम संबंध व ओळखीतून झालेल्या सहवासातच घडल्याचे सुद्धा निदर्शनात आले.
यवतमाळ येथील चैन स्नॅचिगच्या घटना पोलिसांना मात्र अपयश आले नसून या घटना पुढील काळात यशस्वीरित्या उघड केल्या जातील असेही पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोडे यांनी सांगितले.
तसेच जिल्ह्यात अवैध दारू जुगार यावरती प्रभावीपणे कारवाई केली असून दारूबंदी कायदा अंतर्गत एकूण ५४८५ गुन्हे नोंद केले आहे. त्या जवळपास ३ कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलेआहे. अवैध जुगार प्रतिबंधक करणे करीता एकूण २१०० केसेस असून २३५० आरोपींवरती कारवाई करण्यात आली आहे. त्यात ३.५ कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २०२२ च्या तुलनेत ही टक्केवारी २८ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच एनडीपीएस कायदेची जिल्ह्यामध्ये प्रभावी कारवाई होण्याकरिता ७४ गुन्हे दाखल केले आहे.
चालू वर्षात शस्त्र अधिनियम अंतर्गत ११४ गुन्हे दाखल केले असून त्यापैकी ३/२५ कलम अंतर्गत १९ गुन्हे दाखल करण्यात आले. यात १८ पिस्टन व २० जिवंत काडतू जप्त केली आहे. या वर्षात तलवार चाकू सुरी जप्तीचे एकूण ९५ गुन्हे दाखल असून यामध्ये ११२ हत्यार जप्त करण्यात आले आहे. चालू वर्षात स्थानिक गुन्हे शाखा व यवतमाळ यांनी चांगली कामगिरी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांवरती वचक निर्माण राहण्याकरिता व गुन्ह्यातील कृत्यांना पाय बंद व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत पाच डोळ्यांमधील एकूण १५ आरोपी तडीपार केली आहे. मपोका कलम ५६ अंतर्गत १४ आरोपी एमपीडीए अंतर्गत एकूण २४ आरोपीस स्थानबद्ध केले आहे.
जिल्हा पोलीस दलाने या वर्षी समाधानकारक कामगिरी केली असून पुढच्या वर्षी अधिक प्रभावी कामगिरी करेल अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
पोलिसांनी वर्षभर अमली पदार्थ व गांजा वरती कारवाई सुरू ठेवली होती. यात महागाव तालुक्यातील घोंनसरा या शिवारात या
लाखो रुपयांची गांजाची अनेक शेतकऱ्यांनी शेतीत लागवड केली होती.
जवळ पास अंदाजन
३५ ते ४० लाख रुपये व त्या पेक्षाही जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गांजा लागवड करणाऱ्या ५ ते ६ शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले.