शिवराज्य दुर्गा उत्सव मंडळाकडून क्रांतीज्योती संस्थेतील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट, नोटबुक, बिस्किट व फुटचे वाटप. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले हास्य.

नेर :- नवनाथ दरोई
शिवराज्य दुर्गा उत्सव मंडळ व समता बहूऊदेशीय संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती महिला बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रातील स्नेह आधार अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट, नोटबुक, बिस्किट, व फळांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम नाताळनिमित्त घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम लाहोटी हे मंचावर विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून नेर नगर परिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल,अनमोल डेव्हलर्पर्स चे भिकेश मलानी, अश्विन दावडा, गणेश शिल्केवार,नामदेव मेश्राम, शिवानी गुगलीया, शितल मालानी, मंचावर विराजमान होते अध्यक्षाच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या समोर मेणबत्ती पेटून, पुष्पमाला अर्पण करण्यात आली. अनाथ विद्यार्थ्यांना एक महिना पुरेल असा किराणा भिकेश मलानी व शितल मालानी या दापत्यांनी संस्थेला देण्याची कबुली दिली. या कार्यक्रमाच्या एशस्वी करीता मयूर काळे,लक्ष्मण वानखडे, रुपेश मिसळे, राजू कांबळे, बाजीराव गजबार, प्रशांत दोनारकर,सागर मालानी, नंदिनी मालानी, अनमोल मालानी यांनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रकाश लाडोळे, प्रास्ताविका कांचन विर,आभार प्रदीप कांबळे यांनी मानले.