अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन दुकान हस्तांतरणाचा नावावर सामान्य दुकानदारांची करीत आहे आर्थिक लुट ?.
दुकान हस्तांतरण शुल्क सर्वांसाठी माफ करण्याची मागणी जोरात …
*सर्व सामान्य दुकानदाराला होणार आर्थिक लाभ …
अचलपूर प्रतिनिधी, किशोर बद्रटिये -अचलपूर
कृषी उत्पन्न बाजार समितीने अचलपूर – परतवाडा रोड ,परतवाडा – अमरावती रोड व लिलाव परिसरात शेतकरी बांधवाचे हित जोपासण्यासाठी भव्य – दिव्य व्यापार संकुलाची निर्मिती केली आहे. या दुकानाच्या हस्तांतरणाचा नावावर कोट्यवधी रुपये अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती ला प्राप्त झाले आहे .बांधलेल्या दुकानांचे हस्तांतरण शुल्क सर्वांना समसमान असावे, जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही, असा मुद्दा संचालिका सौ.वर्षाताई कैलास आवारे यांनी शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत मांडला.मात्र आता हस्तांतरण संपूर्ण शुल्क माफच करण्यात यावे ,अशी मागणी सामान्य शेतकरी बांधवाकडून होत आहे. बाजारसमितीने अचलपूर आणि अमरावती मार्गावर आणि लिलाव परिसरात भव्य – दिव्य दुकाने बांधली आहे. अमरावती मार्गावरील १ ते ३० क्रमांकाच्या दुकानांना ३ लाख, अचलपूर मार्गावरील संत गाडगेबाबा मार्केटमधील १ ते ८० दुकानांना ५० हजार, अमरावती मार्ग टीएमसी मार्गावरील १ ते १९ दुकानांसाठी १ लाख, तर अचलपूर मार्गावरील १ ते १६ दुकानांसाठी १ लाख रुपये हस्तांतरण शुल्क घेतले जाते.
बाजारसमितीच्या परिसरात सामान्य शेतकरी ,नागरिक ,बेरोजगार तरुणानी मोठ्या प्रमाणात दुकाने लिजवर घेतली.पण हस्तांतरण शुल्काची रकमेचा भरणा करायचा तरी कसा ? हा गंभीर प्रश्न अनेक इच्छुक सामान्य दुकानदाराच्या समोर निर्माण झाला आहे. यामुळे सामान्य दुकानदाराणा दिलासा म्हणून हा हस्तांतरणाचा शुल्क माफीचा निर्णय अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले व संचालक मंडळ घेणार काय? या कडे अचलपूर तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू ,सामान्य दुकानदाराचे लक्ष लागले आहे.