Uncategorized

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाला अपघात 

Spread the love
मुंबई / विशेष प्रतिनिधी
            राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. सावंत यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

तानाजी सावंत  हे अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन श्रीक्षेत्र ज्योतिबाच्या दर्शनाला निघाले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील मागच्या गाडीने जोरदार धडक दिल्याची माहिती आहे. हा अपघात गाड्यांचा एकमेकांना अंदाज न आल्यामुळे घडल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघातामुळे तानाजी सावंत यांचा ताफा अपघातस्थळी थांबला होता.

तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झाल्याने त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे, मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनूसार तानाजी सावंत यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. या अपघातात तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.

तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीने दिलेली धडक चांगलीच भीषण असल्याचं दिसत आहे. धडक देणाऱ्या गाडीचं बोनेट चांगलंच चेंबलेलं दिसत आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या या दौऱ्यात चांगलंच विघ्न आलेलं पहायला मिळालं.

दरम्यान, या अपघात मंत्री तानाजी सावंत यांना दुखापत झाली नसून ते व्यवस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एका महत्त्वाच्या मंत्र्याच्या गाडीला अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close