आमदार वानखडे यांच्या गाडीचा अपघात , एक ठार तर दोन गंभीर जखमी.
दर्यापूर अमरावती मार्गावरील लखापुर फट्यावरील घटना
दर्यापूर:- दर्यापूर विधान सभेचे आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीच्या अपघातात एक ठार तर दोन गंभीर झाल्याची घटना दर्यापूर अमरावती मार्गावरील लखापुर फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी ६:१५ वाजता घडला आहे.
अपघातात म.खलिक म. अमजद 55 रा. दर्यापूर असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तिचे नाव असून सुरेश शामराव सावळे वय 50 समता नगर ,विमालाबाई जानराव राऊत 50 टाटा नगर, हे दोघे गंभीर जखमी झाले असुन त्यांना उपचाराकरिता अमरावती येथे पाठविण्यात आले आहे तर संगीता संजय नांदणे 35 ,नीता उमेश सावळे 35 ,संजय सुरेश इंगळे 55 , लक्ष्मी गोपाल चाव्हान 45 हे अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. आमदार बळवंत वानखडे व आमदार यशोमती ठाकूर हे अमरावती वरुन दर्यापूर येथे एका शाळेच्या कार्यक्रमासाठी येत होते. दर्यापूर वरुन ६ कि.मी.अंतरावर लखापुर फाट्याजवळ मजूर ट्रॅक्टर मध्ये कापसाचे गाठवडे भरत होते. तेव्हा आमदारांच्या गाडीने ट्रॅक्टरला जबर धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. मृतक म. खालीक म. अमजद हे दर्यापूर सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष होते.