सामाजिक

तेरे दरसे होकर कोई मायूस …..

Spread the love

आठ दिवसानंतर परतले 72 वर्षीय वृद्ध आपल्या कुटुंबात

अहमदनगर / नवप्रहार मीडिया 

               देशाच्या कान्याकोपऱ्यातून भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. साई बाबांच्या दर्शनासाठी असेच एक कुटुंब ओडिशा राज्यातून शिर्डी ला आले होते. पण कुटूंबातील 72 वर्षीय वृद्धाची ताटातूट झाली. कुटुंबातील इतर लोकांनी त्याचा खूप शोध घेतला. पण त्यांना शोधण्यात यश आले नाही. शेवटी कुटुंबीयांनी पो.स्टे. गाठून तक्रार नोंदवली. पोलिसही वृद्धाच्या शोधात लागले. अश्यातच हे गृहस्थ एका रिक्षा चालकाला शिर्डी पासून जवळ असलेल्या पुनतांबा येथे आढळून आल्याने त्यांने स्थानिकाच्या मदतीने शिर्डी येथील ठाण्यात आणून सोडले.यामुळे आठ दिवसानंतर आजोबा कुटुंबात परतले. 

घटेनेबाबत अधिक माहिती अशी की, ओडिशा राज्यातून परिवारासह साईदर्शनासाठी आलेले 72 वर्षीय बैरागी राऊत यांची कुटूंबापासून ताटातूट झाली होती. शोधाशोध करूनही वडिलांचा थांगपत्ता लागत नसल्याने अखेर मुलाने पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. दरम्यान स्थानिक पत्रकार प्रशांत अग्रवाल आणि रिक्षाचालक अख्तर पठाण यांच्या मदतीमुळे अजित बैरागी यांची आठ दिवसानंतर आपल्या बेपत्ता वडीलांशी भेट झाली.

शिर्डीपासून जवळच असलेल्या पुणतांबा गावात रिक्षा चालकाला एक बेपत्ता व्यक्ती फिरताना आढळून आली. रिक्षाचालक अख्तर पठाण यांनी या व्यक्तीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाषेचा अडसर होता. त्यामुळे अख्तर पठाण यांनी या व्यक्तीला घेऊन थेट शिर्डी गाठली.  अख्तर पठाण आणि पत्रकार प्रशांत अग्रवाल यांनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे तब्बल आठ दिवसांनतर बाप, लेकाची भेट झाली आहे. या भेटीमुळे सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तराळले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close