सामाजिक

वृद्ध निराधारांच्या धरणे आंदोलनाला यश . लाल बावटा शेतमजुर युनियनच्या नेतृत्वात आंदोलन

Spread the love

नांदगांव खंडेश्वर/ पवन ठाकरे
इंदीरा गांधी वृद्धपकाळ योजने अंतर्गत केंद्र सरकार कडून मिळणारे मासिक २०० रु . अनुदान गेल्या १९ महिण्यापासून न मिळालेल्या वृद्ध निराधार शेतमजुरांनी सोमवार दि . ११ डिसें. रोजी तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन केले . या आंदोलनाची नांदगांव खंडे . चे तहसिलदार मा. पुरुषोत्तम भुसारी यांनी दखल घेत रखडलेल्या १९ महिण्याच्या अनुदाना पैकी ६ महीण्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले व उर्वरित १३ महिण्याचे अनुदान निधी प्राप्त होताच त्वरीत जमा करण्याचे लेखी आश्वासन दिल्या मूळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले . इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन अनुदान योजने अंतर्गत ६५ वर्षावरील वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना सरकार कडून १००० रु . मासिक अनुदान मिळते, यातील २०० रु . केंद्र सरकार कडून प्राप्त होते. मात्र गेल्या १९ महिण्यापासून केंद्र सरकारने आपल्या हिश्श्याचे अनुदान न पाठविल्यामुळे तालुक्यातील वृद्ध निराधार आर्थिक अडचणीत सापडले होते . महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजुर युनियन चे नेते कॉ. तुकाराम भस्मे यांचे नेत्तृत्वात तालुक्यातील वृद्ध निराधारांनी गेल्या जुलै महिन्यात मा . जिल्हाधिकारी अमरावती यांची भेट घेवून हि बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती . मात्र अनुदान न मिळाल्यामूळे अखेर तालुक्यातील वृद्ध निराधार लाभार्यांनी नांदगांव तहसिल पूढे एक दिवसाचे धरणे आंदोलन केले . तहसिल प्रशासनाच्या सहकार्या मूळे या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली . यावेळी शेतमजुर युनियन चे तालुका सचिव लक्ष्मण भगेवार, तालुका अध्यक्ष अविनाश कणसे , बाबाराव इंगळे, अरुणभाई शिंदे ,मनोहर कोराट , सुरेश बुधले , भागवत भालेकर , सदाशिव मेहेंगे , भागूबाई घाटे , रुख्माबाई मांजरे , इंदूबाई बिल्लेवार , पंचफुला शिंदे , अर्जून तरेकार , कमलाबाई खडसे , वच्छलाबाई साखरकर , रामकृष्ण वैदय, भगवान भोयर, एकनाथराव लांबट , विष्णूजी ठाकरे , इंदूबाई राऊत , रमाबाई शेंडे इत्यादी सह मोठ्या संख्येने लाभार्थी हजर होते .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close