साडे 12 लाख रु.ची डिफेन्स परिसरात लूट करणारे आरोपी अखेर वाडी पोलिसा कडून जेरबंद!
डिफेन्स येथील अग्रवाल गॅस कर्मचाऱ्याला जखमी करून लुटले!
दोन्ही आरोपी युवक वाडी परिसरसतील!
वाडी / प्रतिनिधी
आयुध निर्माणी अंबाझरी डिफेन्स परिसरातील अग्रवाल गॅस एजेन्सीचे व्यवस्थापक सिद्धार्थ सुखदेवे वय-५९ वर्ष रा.वसंत विहार,वाडी हे नेहमी प्रमाणे गत ४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता आपल्या कार्यालयातुन व्यवसायाची १२ लाख ५७ हजार रकम घेऊन दुचाकीने जवळच्या युको बँकेत जमा करायला जात असतांना दोन अज्ञात आरोपी शाईन होंडा दुचाकीने आले व सिद्धार्थ यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याच्या साहाय्याने मारहाण व जखमी करून यांच्या हातातून पैशाची बँग हिसकावून पसार झाले होते. डिफेन्स सारख्या सुरक्षित क्षेत्रात ही घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती पोलीस विभागाला समजताच घटनास्थळावर पोलीस उपायुक्त अनुराग जैन,एसीपी प्रवीण तेजाडे इं.नी भेट देऊन आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे वाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर यांना निर्देश दिले.
पो.नि.प्रदीप रायन्नावर यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पुढील तपास सुरू केला.परंतु परिसरात कुठल्याही प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज नसल्याने ही घटना वाडी पोलिसांसाठी मोठी आव्हानात्मक ठरली होती. मात्र या घटनेत वाडी डीबी पथकाने आपले कौशल्य पणाला लावून गुन्हेगारा पर्यंत पोहचुन त्यांच्या मुसक्या आवळल्या.वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ आरोपींना अटक करण्यात आले आहे.
या संदर्भात पो.नि प्रदीप रायण्णावार यांनी सांगितले की गुप्त माहितीच्या आधारे मोठ्या शीताफिने डीबी पथकाचे सपोनि राहुल सावंत यांच्या पथकाने यशस्वी सापळा रचून आरोपी हर्षल रोशन मेश्राम वय-२० वर्ष रा.नवनीत नगर,इमरान इब्राहिम शेख वय-२९ वर्षे रा. आठवा मैल या आरोपींना अटक केली. आरोपींनी गुन्हा कबूल केला असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मोटरसायकल ही सुद्धा चोरीची असल्याचे प्राथमिक तपासात कबुल केले आहे.या गुन्ह्यात अजून सहभाग व लुटलेली रकम या बाबत पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे.