फिरत्या रुग्णवाहनीचे घाटंजित डॉ.अत्रे हस्ते स्वागत

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी-आज दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माननीय हंसराज भैय्या अहिर यांच्या प्रयत्नामुळे सीएसआर फंडातून रुग्णाच्या सेवेसाठी फिरत्या रुग्णालयाच्या व्हॅनचे आज घाटंजी येथे प्रतिष्ठित डॉक्टर अत्रे यांच्या हस्ते फीत कापून स्वागत करण्यात आले.रुग्णसेवेसाठी बोधडी येथे ती रुग्णवाहिका पाठविण्यात आली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू शुक्ला, तालुका अध्यक्ष सुरेश डहाके,जेष्ठ नेते मधूसूदन चोपडे सर,शहराध्यक्ष राम खांडरे,अभिजीत झाडे,नंदकिशोर डंभारे,चेतन जाधव,भावेश सूचक, प्रकाश राठोड, संदीप माटे, जितेंद्र कळसकर ,गोपाल काळे किशोर डंभारे, रामसिंग राठोड ,वसंतराव काळे, नरेंद्र ढवळे, सुभाष आडे, जगदीश रोकडे, प्रवीण चव्हाण आणि डॉक्टरची टीम,भाजपा महिला सौ रीना धनरे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.