शैक्षणिक

अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन संपाचा ११वा दिवस . मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन . १८ डिसेंबरला नागपूर विधानसभेवर धडकणार लाल वादळ

Spread the love

 

नांदगांव खंडेश्वर / पवन ठाकरे
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन ( संलग्न आयटक) च्या वतीने अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी नांदगांव खंडेश्वर पंचायत समिती कार्यालया पुढे धरणे आंदोलन केले . दि.४ डिसेंबर पासून राज्यभरातील अंगणवाडी बालवाडी सेविका मदतनिसांनी आपल्या मागण्या साठी बेमुदत संप पुकारला आहे . आज संपाच्या ११ व्या दिवसी तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनिस यांनी पंचायत समिती कार्यालयापूढे धरणे आंदोलन करून सरकार विरोधात तिव्र निदर्शने केली . संघटनेच्या वतीने पंचायत समिती प्रशासनामार्फत मा . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात अंगणवाडी सेविका मदतनिस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या . अंगणवाडी सेविकांना २६००० रु व मदतनिस यांना २०,००० रु .किमान वेतन प्रती महीना लागू करा . भविष्य निर्वाह निधी , ग्रॅज्युईटी , निर्वाह भत्ता इत्यादी सामाजिक सुरक्षा सेवा लागू करा .महागाई निर्देशांकानुसार वेतनात वाढ करा . निवृत्ती नंतर पेंशन , ग्रॅज्युईटी , लागू करा . अंगणवाडी सेविका , मदतनिस यांच्या रिक्त जागा त्वरीत भरा . इत्यादी मागण्या करण्यात आल्या . येत्या १८ डिसेंबर ला आयटकच्या वतीने नागपूर विधान सभेवर आयोजित केलेल्या महामोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या तालुका अध्यक्ष कॉ. रेखा नवरंगे यांनी केले . यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ सुनिल मेटकर यांनी अंगणवाडी सेविका मदतनिस यांच्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनास पक्षाचे वतीने जाहीर पाठींबा दिला .धरणे आंदोलनात सेविका रेखा नंवरंगे पुष्पा ढाले संगिता ताबैकर संगिता सपाटे सुनिता जाधव रुकसाना खातुन सुरेखा गोपाळे दिपाली पुसदकर शिल्पा सोळंके आरती पाटील सुनिता कापसे ,श्रीमती विखे सह तालुक्यातील सर्वच अंगणवाडी सेविका ,मदतनिस यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close