अखेर काँग्रेसच्या दोन दिवशीय साखळी उपोषनाची सांगता

हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदाराने घाटंजी तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करणार असल्याचे दिले आश्वासन
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
घाटंजी- यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतीपिकांची हानी केली. कापूस व सोयाबीन हे पिक उद्ध्वस्त झाले. घाटंजी तालुका दुष्काळातुन वगळल्यामुळे त्याचा विरोध म्हणून दोन दिवसापासून घाटंजी तहसील कार्यालयापुढे काँग्रेसच्या वतीने युवा नेते जितेंद्र मोघे यांच्या नैतृत्वात दोन दिवशीय साखळी उपोषण सुरु होते आज 13/12/23 उपोषणाचा दुसरा दिवस उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सह अनेक सामाजिक संघटनानी पाठिंबा जाहीर केला. शेतकरी बांधवांची हजारोच्या संख्येत असलेली उपस्थिती पाहून प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून मा. तहसीलदार साळवे साहेब, तालुका कृषि अधिकारी राठोड, महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता कुऱ्हा साहेब, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव चन्नावार, ए आर ऑफिसर, पं समितीचे प्रतिनिधी यांनी उपोषणास्थळी उपोषण कर्त्यांना भेट दिली. त्यावेळी शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून येत होता आलेल्या अधिकार्यानी उपोषण कर्त्यांनी सुमारे एक तासाच्या वर उपोषणस्थळी बसवून उपोषणात ज्या मागण्या केल्या त्यावर सखोल चर्चा केली आणि शेतकऱ्यांचे समाधान केले.अखेर उपोषणास्थळी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मा तहसीलदार यांनी अंतिम आनेवारी ही अट्टेचाळीस पैसापेक्षा कमी करू आणि आपला घाटंजी तालुका नक्कीच दुष्काळ जाहीर करू असे जाहीररित्या आश्वासन दिले. आणि उर्वरित मागण्या दोन ते तीन दिवसात निकाली काढण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी आदेश देताच शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा करत ”बाळासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ”अशी घोषणा दिली. यावेळी उपोषण स्थळी शेतकरी नेते मोरेश्वर वातिले,यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी चाललेल्या साखळी उपोषणाला काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंतरावजी पुरके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना संबोधित केले. उपोषणास्थळी अनेक शेतकऱ्यांनी घाटंजी कृषि उत्त्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये कापूस खरेदी ही हमीभावपेक्षा कमी दराने केली जात असल्याचा आरोप करत ही बाब मा. तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचवेळी तहसीलदार यांनी कृ. ऊ. बाजार समितीच्या सचिवाना बोलवून हमीभावपेक्षा कमी दराने कापूस खरेदी करता कामा नये अशी ताकीद दिली.सदर मोर्चाला यवतमाळ अरविंद वाढोनकर अध्यक्ष ओबीसी शेल काँग्रेस बल्लू पाटील लोणकर, संजय पाटील इंगळे, माणिकराव मेश्राम आशिषबाबू लोणकर,डॉ विजय कडू,अभिषेक पाटील ,किशोर दावडा,परेश कारिया,सुभाष गोडे,संजय गोडे, रुपेश कल्यमवार,अनंतराव चौधरी,शेतकरी नेते मोरेश्वर वातीले, शिवसेना तालुका प्रमुख मनोज ढगले मनोज राठोड, प्रशांत मस्के, गौत्तमराव चौधरी नारायण भोयर ,कैलास कोरवते अरविंद चौधरी,सहदेव राठोड, संजय पाटील निकडे, राजू मुनेश्वर, मारोती पवार बळीराम पवार वैजयंती ठाकरे, शोभा ठाकरे, स्मिता भोयर,गणेश मुद्दलवार,गणेश वल्लबवार,संजय आरेवार,रमेश आंबेपवार,गोरख कानिदे, राहुल पाटील आकाश आत्राम, अरविंद जाधव, जितेंद्र जुनघरे,अरुण कांबळे,सागर डभारे,सुनील हूड,अक्षय पवार,अतुल राठोड,अब्रार पटेल रफिक पटेल विक्की ढवळे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शेतकरी मोठया संख्येने उपस्थिती होते युवा नेते बाळासाहेब मोघे यांनी सर्व शेतकऱ्यांचे जाहीर आभार मानले.
0000000
मागण्या
, घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करा, पीकविमा कंपन्यांकडून नुकसानिचे सर्वेक्षण करून सरसकट मदत द्या,तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. कापसाची आयात बंद करण्यात येऊन , कापसाचे दर वाढविण्यात यावे. जंगली जनावरांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी. शेतकरी यांना दिवसा वीजपुरवठा द्यावा,सर्व कोरडवाहू शेतकर्यांना तात्काळ जलसिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी बि-बियाणे रासायनिक खते व औषधी यांचे दर कमी करण्यात यावे. शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते करण्यात यावे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी यांच्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे .आदी महत्वाच्या मागण्यासह सतरा मागण्या करण्यात आल्या.
शेतकऱ्यांचे शिष्ठमंडळ यांना दोन दिवसानंतर मा तहसीलदार यांनी तहसील कार्यलयात तालुक्यातील आणि उपोषणात ज्या मागण्या करण्यात आल्या त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ दिला असून सर्व मागण्याच्या बाबतीत उपोषण कर्त्यांचे समाधान करणार असल्याचे तहसीलदारानी सांगितले