सासऱ्याशीअनैतिक संबंध असणाऱ्या आणि तरुणाच्या प्रेमात पडलेल्या सुनेने सासऱ्याची केली हत्या

सासऱ्याशीअनैतिक संबंध असणाऱ्या सुनेने सासऱ्याची केली हत्या
प्रायव्हेट पार्ट कापून मृतदेह घरात सोडून काढला पळ
मुंबई / विशेष प्रतिनिधी
अलीकडच्या काळात अनैतिक संबंधाला काही मर्यादा उरल्या नाहीत.काकांचे पुतणी सोबत ,मामाचे भाची सोबत , इतकेच काय तर चुलत बहिणीचे भावा सोवत आणि सासऱ्याचे सुनेसोबत अनैतिक संबंध असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे. अश्याच अनैतिक संबंधातून हत्येची घटना सप्टेंबर 2023 महिन्यात गुजरात राज्यात घडली होती. सुनेचे सासऱ्या सोबत अनैतिक संबंध होते.दरम्यान तिचे तरुणा सोबत देखील अनैतिक संबंध होते. तरुणाला 2 लाख रुपयांची गरज असल्याने सुनेने सासऱ्याकडे पैशाची मागणी केली . सासऱ्याने ती पूर्ण न केल्याने तिने त्याचा खून केला.
घराच्या बाहेर एका प्रायव्हेट रूममध्ये सून आणि सासरा एकमेकांशी संबंध ठेवायचे. त्यासाठी सासरे तिला पैसेही द्यायचे. फेसबुकच्या माध्यमातून सून अन्य एका युवकाच्या संपर्कात आली. त्याने तिला परदेशात नेण्याचं आमिष दाखवलं. त्यासाठी तिला दोन लाख रुपयांची गरज होती. ते तिला मिळाले नाहीत. त्यामुळे सुनेने प्रायव्हेट पार्ट कापून सासऱ्यांची हत्या केली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.
खेडा जिल्ह्याच्या डाकोर भागातले जगदीश शर्मा (75 वर्षं) तीन दिवस बेपत्ता होते. सर्वांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मोठा मुलगा विजयभाई शर्मा यांच्यासह काही जण शोध घेत चोलमधल्या घरी गेले, तर तिथे कुलूप दिसलं; मात्र कुलूप तोडल्यानंतर जगदीश यांचा नग्नावस्थेतला विच्छिन्न झालेला मृतदेह सापडला. तातडीने पोलिसांना कळवण्यात आलं.
पोलिसांनी मृतदेह फॉरेन्सिक लॅबला पाठवला. डोकं आणि प्रायव्हेट पार्टला मोठी जखम झाल्याने मृत्यू झाल्याचं तपासात निष्पन्न झालं. दरम्यान, विजयभाई यांनी आपल्या धाकट्या भावाची पत्नी मनीषा शर्मा हिच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. त्यातून जे सत्य समोर आलं, त्याने सर्वांनाच हादरवून सोडलं.
मनीषाने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितलं, की सासरे जगदीशभाई यांच्याशी ती अनेकदा अनैतिक संबंध ठेवायची. त्या बदल्यात सासरे तिला पैसे द्यायचे. महिन्याभरापूर्वी तिची फेसबुकवर एकाशी ओळख झाली. त्याने तिला परदेशी जाण्याचं स्वप्न दाखवलं. त्यासाठी तिला दोन लाख रुपयांची गरज होती. सासऱ्यांकडे मागितल्यावर त्यांनी तिला नकार दिला. त्यामुळे मनीषा रागावली आणि तिने हत्येचा प्लॅन आखला.
त्यानुसार, ती सासऱ्यांसह चोलमधल्या घरी गेली. शारीरिक संबंध ठेवताना तिने सासऱ्यांच्या प्रायव्हेट पार्टवर हत्याराने वार केला आणि थंड डोक्याने त्यांच्या डोक्यावरही वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर ती बाहेर आली आणि घराला कुलूप लावून पुन्हा कुटुंबीयांसमवेत काही घडलेलंच नाही, अशा रीतीने ती राहू लागली.
तीन दिवस जगदीशभाई घरी आले नाहीत, त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या त्यांच्या मोठ्या मुलाने राजस्थानातल्या आपल्या नातेवाईकांकडे चौकशी केली. मनीषा स्वतःदेखील त्यांना शोधण्याच्या कामात सहभागी झाली. ते कुठेच सापडले नाहीत. शेवटी चोलमधल्या घरात त्यांचा मृतदेह सापडला. नात्यांना कलंक लावणारी ही सून आता पोलिसांच्या ताब्यात आहे.