हटके

स्वयंपाक्याचा तडका आणि लग्न मंडपात उडाला भडका

Spread the love

            सोशल मीडियावर दिवसाकाठी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात . कोणी काही केले की तो लगेच व्हिडीओ किंवा रील बनवतो आणि ती सोशल मीडियावर व्हायरल करतो. तसे पाहिले तर स्वयंपाक ही एक कला आहे. काही पदार्थ बनवतांना काही लोक अशी काही  करामत करतात  की त्यांची ती आगळीवेगळी स्टाईल लगेच प्रसिद्ध होते. एका स्वयंपाक करणाऱ्या मुलाने देखील भाजीला तडका लगावला पण त्या तडक्याने असा भडका उडाला की लग्न मंडपात पळापळ माजली.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती डाळीला असा काय तडका देतो, ज्याने समारंभासाठी उभारलेला मंडप जळून जातो. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील युजर्स हसत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती समारंभानिमित्त स्वयंपाक करत आहे. यासाठी त्याने एका मोठ्या पातेल्यात डाळ शिजवून बाजूला ठेवली आहे. कुकिंगच्या काही खास टेक्निक वापरून तो हा स्वयंपाक करतोय. यानंतर तो चुलीवर एक छोटे पातेले ठेवतो आणि त्यात डाळीला तडका देण्यासाठी तेल, मसाल्यासह सर्व साहित्य टाकतो. हे सर्व साहित्य चांगल्याप्रकारे भाजल्यानंतर तो ते पातेलं उचलतो आणि मोठ्या पातेल्यातील डाळीला तडका देतो. पण, या तडक्याचा असा काय भडका उठतो की, ज्याने समारंभासाठी बांधलेला मंडप जळून जातो. या तडक्यादरम्यान जोरदार आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसल्या.

 

 

 

 

या मोठ्या ज्वाला पाहून ती व्यक्ती घाबरते आणि पातेलं तिथेच टाकून दूर पळते. यावेळी मोठ्या पातेल्यातून इतक्या तीव्र ज्वाला बाहेर पडल्या की, वरचा मंडप जळून खाक झाला. आग विझताच ती व्यक्ती पुन्हा पातेल्याजवळ येते, परंतु तोपर्यंत मंडपाचे नुकसान झालेले असते.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावर युजर्स मजेशीर कमेंट्सही करत आहेत. यावर एका युजरने लिहिले की, ‘भाऊ, आग लावण्याचे काम तुम्ही करता.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘ये है देगी मिर्च का असली तडका अंग- अंग के टेंट भी फडका,’ अशा मजेशीर कमेंट्स युजर्स करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close