सामाजिक
दवलामेटीत विवाहित तरुणाची झाडाला फाशी लागून आत्महत्या
दवलामेटी (प्र ) : वाडी पोलीस स्टेशनं अंतर्गत दवलामेटी आठवा मैल येथील पालकर नगर रहिवाशी विवाहित तरुण करमसिंग उर्फ मोनू वाल्मिकी वय 29 याने नवनीत नगर येथे एका झाडाला दोराचा साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली . मृताकाची पत्नी मागील काही दिवसा पासून माहेरी राहायला गेली तेव्हा पासून मोनू उदास असायचा अशी माहिती मृतकाचा नातेवाईक व मित्रांकडून मिळाली. या घटनेची माहीती वाडी पोलिस स्टेशनला मिळताच वाडी पोलीस घटना स्थळी पंचनामा करून मृतकाचे शव उतरीय तपासणी साठी नागपूर येथील शासकीय रुग्नालयात पाठविन्यात आले. आत्महत्या चा कारणाचा तपास वाडी पोलीस ए एस आय नवलं किशोर करित आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1