सामाजिक

ती पाय घसरून 400 फुट खोल दरीत कोसळली ; दैव बलवत्तर  म्हणून …..

Spread the love

पनवेल / नवप्रहार मीडिया .

               पेब किल्ल्यावर ट्रेकिंग साठी आलेल्या तरुणीचा पाय घसरल्याने ती 400 फूट खोल दरीत कोसळली. पोलिसांनी स्थानिक नागरिक व सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. दैवबलवत्तर तरुणी थोडक्यात बचावली आहे.

जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून माथेरानचे नाव आहे. परंतु याच माथेरानच्या एका बाजूस सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर प्रसिद्ध असा पेब किल्ला मोठ्या दिमाखात उभा असून पर्यटकांना खुणावत असतो. या पेब किल्ल्यावर हजारो पर्यटक आणि ट्रेकर हे ट्रेकिंगसाठी येत असतात. दरम्यान 2 डिसेंबर रोजी मुंबई अंधेरी ओशिवरा येथील ऐश्वर्या प्रकाश धालगडे ही तरुणी आपल्या 4 मित्र अनिकेत भरत मोहिते, अंकिता रामदास मराठे,रुपेश राजाराम वीर तर तनवी विलास पार्टे यांच्यासोबत पेब किल्ला सर करण्यासाठी म्हणून अवघड वाटेने आली होती.

दरम्यान, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्याचा अवघड वाटेने येत असताना पाय घसरला आणि ती खोल दरीच्या बाजूस 350 ते 400 फूट खोल दरीत कोसळली. यावेळी ऐश्वर्याला बाहेर काढणे कठीण असल्याने सोबत असलेल्या मित्र मैत्रिणीनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता किल्लावरील मंदिरातील पुजारी यांनी ही माहिती नेरळ पोलीस तर माथेरान पोलीस यांना देताच माथेरान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शेखर लव्हे यांनी माथेरान सह्याद्री रेस्क्यू टीम तर स्थानिक ग्रामस्थाना सोबत घेऊन मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले होते.

यावेळी खोल दरीत पडलेली जखमी अवस्थेत असलेली ऐश्वर्याला दोरीच्या साहाय्याने पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले असता तिच्या पायाला आणि अंगावर गंभीर दुखापत झाल्याने प्रथम उपचार करून लागलीच रुग्णवाहिकेतून बदलापूर येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले होते. ही घटना पनवेल पोलीस ठाणे हद्दीत येत असल्याची माहिती देण्यात आली. तर पीडित तरुणीच्या कुटुंबाला देखील माहिती देण्यात आली. एकूणच माथेरान पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शेखर लव्हे यांनी माथेरान सह्याद्री रेस्क्यू टीमचे तर स्थानिक ग्रामस्थांचे आभार मानत कामाचे कौतुक केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close