मुलाखतीत तरुणीला विचारण्यात आला भलताच प्रश्न ….. प्रश्न वाचून ती गोंधळली

नोकरी साठी मुलाखत देतांना मुलखात घेणाऱ्या कडून उमेदवाराला प्रश्न विचारणे हा मुलाखतीचा एक भाग आहे. पण मुलाखत ज्या साठी आहे त्याविषयला प्रश्न विचारल्या जातील अशी अपेक्षा उमेदवाराला असते. हा वेगळा भाग आहे की एमपीएससी आणि यूपीएससी उमेदवाराला असे प्रश्न विचारले जातात की सामान्य माणूस त्या प्रश्नांनी गोंधळात पडतो. काही वेळा तर प्रश्न कल्पनेपालिकडले असतात.
काही ठिकाणी मुलाखती दरम्यान लिखित परीक्षा (चाचणी ) घेतल्या जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या अर्जदारालाच नोकरी मिळते. नोकरी मिळावी यासाठी बहुतांश जण मुलाखतीला जाताना वेगवेगळ्या पद्धतीनं पूर्ण तयारी करतात. काही वेळा मुलाखतीच्या वेळी विचित्र किस्से घडल्याचंही आपण ऐकतो, वाचतो. सध्या असाच एक प्रकार खूप चर्चेत आहे. दरम्यान, एका कंपनीने एका महिलेला असा प्रश्न विचारला की, उत्तर नेमकं द्यावं तरी काय, असा प्रश्न महिलेसमोर उभा राहिला.
महिलेने फोटो केला शेअर
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर करताना बीटा नावाच्या महिला युजरने तिचा एका कंपनीसोबतचा अनुभव शेअर केला. त्याचा स्क्रीनशॉट आता इंस्टाग्रामवर खूप वेगाने व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये महिलेने लिहिले की, ‘जॉब अॅप्लिकेशनवर मी पाहिलेला हा सर्वात विचित्र प्रश्न आहे.’
असं कोणतं प्रश्न कंपनीने महिलेला विचारलय. ज्यामुळे महिलेने सर्वात विचित्र प्रश्न असल्याचे म्हटले आहे. कंपनीने नोकरीच्या अर्जात महिलेला विचारले, ‘तुम्हाला एक हत्ती देण्यात आला आहे तुम्ही ते देऊ शकत नाही किंवा विकू शकत नाही तुम्ही हत्तीचे काय करणार?’ हा प्रश्न वाचून जणू काही ही महिला UPSC मुलाखतीला बसली आहे, असं वाटतयं. हा प्रश्न ऐकताच महिला उत्तर नेमकं द्यावं तरी काय या विचारात पडली. मात्र, ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
लोकांनी दिली मजेशीर उत्तरे
इंस्टाग्रामवर नगेट नावाच्या अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. वृत्त लिहिपर्यंत १९ हजारांहून अधिक लोकांनी या पोस्टला पसंत केले आहे. पोस्ट पाहिल्यानंतर आणि प्रश्न वाचल्यानंतर लोकांनी खूप मनोरंजक उत्तरेही दिली आहेत. एका यूजरने विनोदाने लिहिले, ‘याचं उत्तर सोपं आहे, फ्रीज उघडा, त्यातून जिराफ काढा आणि हत्तीला आत बंद करा.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘त्या हत्तीला युद्धात घेऊन जा’ तिसरा युजर म्हणाला, ‘जर तुम्हाला काम दिले जात नसेल तर स्पष्टपणे नकार द्या,’ हे किती हास्यास्पद कृत्य आहे.