२ लाखाच्या गुटख्यासह पाच लाखाचा ऐवज जप्त
अमरावती, / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटक्याची जिल्ह्यात तस्करी सुरूच आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांदुर रेल्वे परिसरातुन एका कारसह एकुण ४ लाख ९९ हजार ७२५ रुपयाचा ऐवज जप्त केला. चांदुररेल्वे रेल्वे स्थानकाजवळ शिवाजीनगर परिसरात रात्रकालीन गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना एम एच २७ बी वाय २४९५ क्रमांकाची कार संशयास्पद फिरताना आढळली. पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, हेडकॉन्स्टेबल सचिन मिश्रा, अमोल देशमुख, गजेंद्र उर्फ बाबा ठाकरे, यांच्या पथकाने सदर कारची तपासणी केली. कारमध्ये प्रतिबंधित गुटखा, पान मसालासह इतरही सामग्री संशयास्पद स्थितीत आढळली. वाहनातून जवळपास १ लाख ९९ हजार ७२५ रुपयाचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला. शिवाय जप्त केलेल्या कारची किंमत ३ लाख असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले
सदर आवैध गुटखा गणेश नारायण माहुलकर यांच्या मालकीचा असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी एकूण ५ लाखाचा ऐवज जप्त करून गणेश माहुलकरसह वाहनचालक संजय रामभाऊ बाबर (दोघेही रा. शिवाजीनगर चांदुर रेल्वे ) यांना अटक केली. दोघांविरुद्ध चांदुर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे