तिच्या प्रामाणिक पणाचे शहरात होत आहे कौतुक
बस मध्ये सापडलेली 5 ग्रॅम सोनसाखळी केली परत
दर्यापूर / प्रतिनिधी
कु. वैष्णवी संजय गुजराथी रा. नेहरूनगर दर्यापूर ही दर्यापूर यवतमाळ बस मध्ये अमरावतीकरिता जात असताना तिला बस मध्ये पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र सापडले. वस्तू सोन्याची असल्याने व महागडी असल्याने तिने सदरचे मंगळसूत्र तिचे वडील संजय गुजराती यांच्या ताब्यात दिले व शहानिशा करून ज्याचे आहे त्याला परत देण्यास सांगितले. वैष्णवी गुजराती यांचे वडील संजय गुजराती यांनी तात्काळ पोलीस स्टेशन दर्यापूर जवळ करून सदरची हकीकत दर्यापूर पोलिसांना दिली असता वैष्णवी संजय गुजराती यांना बस मध्ये मिळालेले पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र श्रीमती जोशना दीपक वानखडे वाहक राज्य परिवहन मंडळ दर्यापूर यांचे असल्याचे दर्यापूर पोलिसांनी शहानिशा करून सिद्ध झाल्याने सदरचे पाच ग्राम सोन्याचे मंगळसूत्र श्रीमती जोशना दीपक वानखडे यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदर घटनेवरून वर्तमान मध्ये माणुसकीचे दर्शन कु.वैष्णवी संजय गुजराथी व त्यांचे वडील संजय गुजराथी यांच्यात दिसून आले.