हटके

बापरे बाप …..  दोन वर्षात हजाराहून अधिक भ्रूणहत्या

Spread the love

डॉक्टरची आत्महया ; तपास सीआयडी कडे 

बंगळूरु  / नवप्रहार मीडिया 

                    देशात गर्भलिंग चाचणी आणि भ्रूणहत्या यावर बंदी असतांना सुद्धा कर्नाटक राज्यात  मागील दोन वर्षात एक हजारापेक्षा जास्त भ्रूणहत्या झाल्याची खळबळ जनक बाब समोर आली आहे. यानंतर संबंधित डॉक्टर आपल्या कार मध्ये मृतावस्थेत आढळुन आला आहे. कारवाईच्या भीतीने त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपविला आहे. याबाबत मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांनी आदेश जारी केला आहे.

पोलिसांना म्हैसूरचे आयुर्वेदिक डॉ. चंदन बल्लाळ आणि त्यांच्या टीमने तीन महिन्यांत २४२ स्त्रीभ्रूण हत्या केल्याची कागदपत्रे, पुरावे सापडले आहेत. दोन वर्षांत एक हजाराहून अधिक भ्रूणहत्या झाल्याचं सांगितलं जातं आहे. निरीक्षक प्रशांत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उदयगिरी (म्हैसूर) येथील आयुर्वेदिक डे केअर सेंटरवर छापा टाकून रुग्णालयाला बंद करण्यात आलं आहे.

रुग्णालयाचे मालक डॉ. चंदन बल्लाळ यांनी मशिन्स वाताहात लावत कागदपत्रे नष्ट केली होती. त्यानंतर चंदनच्या घराची झडती घेतली असता रुग्णालयातील रजिस्ट्रर सापडले. ज्यामध्ये सर्व तपशील मिळाला. संघटित नेटवर्कद्वारे गर्भपातासाठी २५ ते ३० हजार रुपये निश्चित केले होते. गुन्ह्यात सहभागी असलेले डॉ. चंदन बल्लाळ, डॉ. तुलसीराम, मीना, लॅब टेक्निशियन रिझमा, वीरेश यांच्यासह नऊ जणांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सिद्धेशसह अन्य फरार आरोपींना पकडण्यासाठी कारवाई सुरू आहे.

धक्कादायक म्हणजे म्हैसूर येथील कोनसूर शासकीय रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर डॉक्टर म्हणून कार्यरत काम करणारा डॉ. सतीश हा शुक्रवारी त्याच्या मोटारीमध्ये मृतावस्थेत आढळून आला. भ्रूणहत्या प्रकरणात त्याचे नाव आले होते. भ्रूणहत्येचे प्रकरण उघडकीस येताच डॉ. सतीश हा फरार होता. पकडले जाण्याच्या भीतीने सतीशने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close