स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध करणारे आता स्वातंत्र्य समर्थक आहोत असे दर्शवतात चंद्रकांत झटाले

महात्मा ज्योतिबा फुले – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्व 2023 व गुरु रविदास विचार मंच यांच्या वतीने ” स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव ” या विषयावर मा. चंद्रकांत झटाले , पत्रकार व साहित्यिक अकोला यांचे व्याख्यान संपन्न झाले. आपल्या भाषणात बोलताना शेतकरी आंदोलनाच्या वेळेस निशान साहेब दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या समोरील पोलवर लावल्या गेला ‘ त्या निशान साहेबांची बदनामी केली आणि खलिस्तानचा झेंडा लावून तिरंग्याचा अपमान केला ‘ अशा प्रकारचा चुकीचा प्रचार व प्रसार करणारे, स्वातंत्र्याच्या आंदोलनाला ज्यांनी विरोध केला तेच आज स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे प्रतीक असलेल्या तिरंग्याचा वापर आज आपणच फक्त राष्ट्रवादी आहोत असा दावा करीत आहेत. या प्रवृत्तीने 50 वर्ष पर्यंत तिरंगा आपल्या संघाच्या मुख्यालयावर लावला नाही. ज्या गांधी भक्तांनी फुले आंबेडकरी भक्तांनी एक बांबू आणि तिरंगा नागपूरच्या संघाच्या कार्यावर लावण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तेव्हा न्यायमूर्ती लोया यांनी त्यांना निर्दोष सोडले. अशांपासून आपण सावध राहिले पाहिजे. असे चंद्रकांत झटाले म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मीनाक्षीताई गव्हाळे यवतमाळ या होत्या. प्रास्ताविक माननीय कमलताई खंडारे – अध्यक्ष गुरु रविदास विचार मंच यवतमाळ यांनी केल. त्या म्हणाल्या सामाजिक समतेची परंपरा जोपासण्याचे काम गुरु रविदासांनी कशाप्रकारे केलं आणि तीच परंपरा आम्ही महिला आता पुढे नेत आहोत. कोणाची साथ मिळो चाहे न मिळो, आम्ही ही परंपरा पुढे नेत राहू अशी भूमिका कमलताई खंडारे मांडली. प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट भाऊराव गंगासागर यवतमाळ हे होते .डॉ. हरीश तांबेकर – बालरोगतज्ञ, डॉ. मीनाक्षी सावळकर प्रदेश काँग्रेस इंटक महाराष्ट्र राज्य. प्रा. सुनिता खोले , चंद्रशेखरजी लहाळगे, रमेश पिंपळखेडे , सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल गुबे यांनी केले. आभार प्रीती दायदार यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गीता चावरे, विद्या इंगळे, सुनिता शेगोकार ,मनीषा खंडारे, कमलताई पतके ,लता सोनटक्के ,संगीता वानरे ,वर्षा डहाके, शुभांगी मालखेडे ,रत्नमाला तांबेकर ,अश्विनी दायदार ,नालंदा वानरे, सुधाताई वाघमारे ,रत्नमाला तांबेकर ,पुष्पाताई बावणे, माधुरी साळवे ,मीनल इटकरे ,प्रतिभा बनसोड, लक्ष्मीबाई इटकरे.कमल मुळे ,अलका शेळके ,सविता मुळे ,गीता चावरे ,वर्षा बावणे ,अभिलाष खंडारे यांनी सहकार्य केलं .