सामाजिक

हज”,या शाॅर्ट फिल्मचे हनुमान नगरीत चित्रीकरण,

Spread the love

यवतमाळ,नेर येथील कलावंतांचा सहभाग, आरुषी गुजर बाल कलावंतांच्या भूमिकेत.

नेर :- नवनाथ दरोई
यवतमाळ जिल्ह्यातील नेर शहराला कलावंतांची नगरी म्हणून ओळखल्या जाते.नेर शहरातील अनेक कलावंत टीव्ही सिरीयल, फिल्ममध्ये दिसून येत आहे. स्व: इंदिराजी गांधी नाट्यगृह कलावंतासाठी छोट्याखानी ठरत असल्यामुळे, यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नेर, दरव्हा, दिग्रस.मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांनी कलावंतासाठी आठवडी बाजारात भव्य दिव्य असे,वीस कोटीचे नाट्यगृहाची निर्मिती केली.हे नाटयगृह थोड्याच दिवसात प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार आहे. देशात शांतता व सुव्यवस्था नांदावी यासाठी “हज” फिल्मची निर्मिती करण्यात येत आहे.या फिल्मचे उद्घाटन नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी कलावंत बापूराव रंगारी नवनाथ दरोई उपस्थित होते.पाहूण्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.हजला जाण्यासाठी पैशाची जूळवाजुळव करण्यासाठी मुस्लिम भाऊ आपल्या मानलेल्या बहिणीकडे घराची चाबी देऊन निघून जातो. असे अनेक जिवंत उदाहरण या फिल्म मधून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या फिल्मचे निर्माते प्रमोद नागमोडे, पटकथा दिग्दर्शक अविश वत्सल,छायाचित्रण एडिटर उघडे, रंगभूषा मुक्तरंग सोनटक्के,मुख्य मुमिकेत प्रमोद नागमोडे, चारुलता पावशेर, बंडू बोरकर,बाल कलावंत आरुषी गुजर, नितेश ललित,हर्षवर्धन तायडे,इस्माईल आजाद, राजेश श्रीवास्तव, सहभागी कलावंत संदीप मिसळे,जयाउद्दीन, नसरुल्लाखा,बाशितखान लक्ष्मण वानखडे, विशेष सहकार्य नवनाथ दरोई,सतिश उरकुडे, खालिक मिर्झा, राजेश मालखेडे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close