Uncategorized

हॉटेल च्या खोलीत  तरुण आणि तरुणीचा मृतदेह  आढळल्याने खळबळ

Spread the love

हॉटेल च्या खोलीत  तरुण आणि तरुणीचा मृतदेह  आढळल्याने खळबळ

भोपाळ ( मध्यप्रदेश ) / नवप्रहार मीडिया 

                     मध्यप्रदेश मधील भोपाळ शहरातील ऐका हॉटेल च्या खोलीत तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. तरुणी चा मृतदेह पंख्याला लटकेलेल्या स्थितीत तर तरुणाचा मृतदेह पलंगावर पडला होता. पण त्याच्या गळ्या भोवती फास होता. अल्पना टॉकीज जवळील बंजारा हॉटेल मध्ये ही घटना घडली आहे. 

           अल्पना टॉकीज जवळील बंजारा हॉटेल मध्ये तरुण आणि तरुणीने खोली बुक केली होती. चेक आउट टाईम झाल्यावर ते बाहेर न आल्याने आणि त्यांनी मुदत वाढ साठी कुठलाही मॅसेज न पाठवल्याने रूम बॉय ल शंका आली. त्याने रूम जवळ जाऊन बघितले तर रूम बंद होती. त्याने आवाज दिल्यावरही आतून कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता.

 त्यामुळे हॉटेल मालकाने याची सूचना पोलिसांना दिली.  पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांच्या उपस्थितीत दरवाजा उघडला असता, एका 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, तर तरुणाचा मृतदेह बेडवर पडलेला होता.

पोलिसांनी सांगितले की, मनीष चक्रवर्ती (23, रा. कटनी ) असे तरुणाचे नाव असून किरण केवट (19) असे तरुणीचे नाव आहे. दोघेही मंगळवारी हॉटेल बंजारा येथे येऊन थांबले होते आणि बुधवारी चेक आउट करणार होते. पोलिसांनी खोलीची झडतीही घेतली, Dead bodies मात्र घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. दोघांच्या कुटुंबीयांना ही बातमी कळवण्यात आली आहे. एफएसएलने तपास केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी हमीदिया रुग्णालयात पाठवले. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close