क्राइम

दिर आणि वहिनित झाले प्रेम : लहान भावाने मोठ्या भावाचा वाजवला गेम 

Spread the love

दिर आणि वहिनित झाले प्रेम : लहान भावाने मोठ्या भावाचा वाजवला गेम 

मधुबनी (बिहार) /नवप्रहार मीडिया

            मोठ्या भावाचे लग्न झाल्यावर तो कांमा निमित्ताने बाहेरगावी राहत होता. घरी जवान वहिनी आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवलेल्या दिरात प्रेम सबंध निर्माण झाले. वेळ मिळेल तेव्हा ते शरिरसुखाचा आनंद घेत होते. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यावर ती गावभर पसरली. हळूहळू ती मोठ्या भावाच्या कानावर गेली. ही बाब समजताच त्याने लहान भावाला मारझोड करून गावातून हाकलून लावले. 

                   लहान भावाला मोठ्या भावाच्या मारण्याच्या आणि गावातून हाकलून लावण्याचा प्रचंड राग आला. आता त्याला वहिनी सोबत ते सगळे करायला भेटणार नाही म्हणून तो विचलित झाला होता. त्याने मोठ्या भावाला धडा शिकवण्याचा प्राण करत मुंबई गाठली. तेथे त्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून मोठ्याला संपवण्याचा प्लॅन आखला.  आणि त्यांना मोठ्या भावाला मारण्याची दीड लक्षात सुपारी दिली. तीस हजार रुपये मोबाईल वरून ऑनलाईन दिले. 

          त्यानंतर तो त्यांना घेऊन सरळ मधुबनी पोहचला. गुन्हेगारांनी आपले काम काम केले आणि ते निघून गेले. सरोज यादव असे आरोपी लहान भावाचे नाव आहे.तर सुशील यादव असे मोठ्या भावाचे नाव आहे. 

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी धाकटा भाऊ सरोजकुमार यादव, सुशील मुखिया आणि शूटर अजय कुमार ठाकूर यांना अटक केली आहे. दरम्यान, दुसरा आरोपी देवन यादव हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. अजय कुमार ठाकूर याच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन गोळ्या जप्त केल्याचे त्याने सांगितले. त्याचवेळी सुशील मुखियाच्या घरातून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close