सामाजिक

अंजनगाव सुर्जी तालुक्यात अवकाळी पावसामुळे पान पिपरी पिकाचे नुकसान

Spread the love

 पान पिपरी हे पीक काळ्याचे झाले पांढरे पीक
 

पान पिंपरी, केळी कापुस, सहीत इतरही पीक उत्पादक शेतकरी अडचणीत

 

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे

गेल्या दोन दिवसा पासून महाराष्ट्र सहीत अंजनगाव तालुक्यात अवकाळी पावसाने अति प्रमाणात हजेरी लावली परंतु या आलेल्या अवकाळी पावसामुळे व निसर्गाच्या चक्रा मुळे तालुक्यातील शेतकरी कमालीचा संकटात आलेला आहे विशेष था ह्यामध्ये मोठ्या मेहनतीने कष्टने गेली वर्ष भरापासून कर्ज बाजा री होऊन पान पिपरी हे वनौषधी पीक उभे केले, परंतु ऐन तोडणीला आलेले पीक व सध्या स्थितीत शेतावरच वाळवनीला टाकलेल्या फडावरच पीक वाळत असतांना अचानक आलेल्या पावसामुळे ह्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाळवत टाकलेले पीक हे पूर्णपणे त्याला उन्हाचा सपोर्ट न मिळाल्यामुळे पांढरे झाले त्यामुळे त्या पिकाचा दर्जाच कमी झाला, परिणामी लागलेला खर्च निघणे कठीण हाले आहे,त्यामध्ये शेतकऱ्याचे ह्यामध्ये नुकसान झाले आहे
सुरवातीपासून दरवर्षी पेक्षा या वर्षी पाऊस नसल्या सारखाच होता परंतु थोड्या फार प्रमाणात ओलित असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिक जगवले व थोड्याच प्रमाणात पिक उत्पादन करण्याचा प्रयत्न करत असतांना आलेल्या या अवकाळी पावसामुळे पान पिंपरी, केळी,कपाशी सहीत इतरही पिके धोक्यात आले.
सध्या स्थितीत पान पिंपरी हे वन औषधी पीक अवकाळी पावसामुळे पुर्ण पणे वाळून जात असुन कपाशी ही पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर लागणार हे निश्चित आहे. पान पिंपरी हे वन औषधी पिक शेतकरी 12 महिन्याचे दरम्यान घेतो आणि अश्या प्रकारे पान पिंपरी पिक घरी येण्या आधीच गेले तर शेतकरी काय करणार असा फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला तसेच
पान पिंपरी पिक वनौषधी पीक असून हे पीक नागरिकांच्या आरोग्याची निगडीत आहे परंतु शासनाच्या अयोग्य धोरणानुसार व निसर्गाच्या आणि अनिमयित्ता मुळे आधीच योग्य भाव न मिळत नसल्यामुळे पान पिंपरी उत्पादक शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहे तर कापुस उत्पादक सुद्धा संकटात आहे या अवकाळी पावसामुळे इतरही अनेक पिके आहेत जे या पावसामुळे नुकसानीच्या मार्गावर आहेत.
तरी सध्या स्थितीत झालेल्या आवकळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत शासनाने त्वरित नुकसान भरपाई ध्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close