विदेश

वाचा …..पाकिस्तान आणि चीन मध्ये भल्या पहाटे लोक रस्त्यावर का आले ? 

Spread the love

               पाकिस्तान आणाई चीन मध्ये भल्या पहाटे भूकंपाचे धक्के लागल्याने घरातील भांडे पडायला सर्वात झाली.. भांड्यांचा आवाज ऐकून गाढ झोपेत असलेले नागरिक खडबडून जागे झाले आणि भूकंप आल्याचे  लक्षात येताच नागरिक घरातून निघून रस्त्यावर आले.

दुसरीकडे पापुआ न्यू गिनीमध्येही मंगळवारी पहाटे सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप झाला. न्यू गिनीच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर झालेल्या या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक घरांना तडे गेल्याची माहिती आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, पाकिस्तानमध्ये आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी होती. घरांना हादरले बसल्याने भाड्यांची पडझड झाली. त्यामुळे गाढ झोपेत असलेले लोक घराबाहेर पडले.

लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. दुसरीकडे चीनला देखील भूकंपाचा हादरा जाणवला आहे. चीनच्या जिजांगमध्ये ५.०.रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

भूकंपा दरम्यान ही घ्यावी काळजी ! 

  • जर तुम्ही इमारतीच्या आत असाल, तर जमिनीवर बसा. मजबूत फर्निचर असलेल्या टेबलखाली सहारा घ्या.
  • जर तुम्ही इमारतीच्या बाहेर असाल तर, झाडे, खांब आणि विजेच्या तारांपासून दूर जा.
  • तुम्ही वाहनात प्रवास करत असाल तर लवकरात लवकर वाहन थांबवा आणि वाहनात बसून राहा.
  • जर तुम्ही ढिगाऱ्याखाली दबले असाल तर कधीही माच लावू नका, हलवू नका किंवा काहीही ढकलू नका.
  • जर तुम्ही ढिगाऱ्याखाली गाडले असाल तर, कोणत्याही पाईप किंवा भिंतीवर हलके टॅप करा.
  • जेणेकरून बचाव कर्मचार्‍यांना तुमची परिस्थिती समजू शकेल. तुमच्या घरात आपत्ती निवारण किट नेहमी तयार ठेवा.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close