संविधान सन्मान दिनी अमृत महोत्सव समारंभ,
राष्ट्रध्वज ध्वजारोहण व राष्ट्रगीत,संविधान पूजा,संविधान उद्देशिका वाचन. भारतीय संविधान म्हणजे मानव
नेर:- नवनाथ दरोई
मुक्तीचा जाहीरनामा.संविधानाने भारतातील सर्व प्रकारचे विषमता जातीभेद समूळ नष्ट करून, राष्ट्रातील तमाम नागरिकांना बंधू भावाच्या अटूत धाग्यामध्ये एकत्रित करून समान न्यायच्या तत्वाचा अंगीकार केला आहे. देशाचा सन्मान म्हणजे संविधानाचा सन्मान होय, या राष्ट्रग्रंथाचा सन्मान करण्याच्या हेतूने 26 नोव्हेंबर हा दिवस भारतभर साजरा केला जातो. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली.अनेक बैठका व चर्चानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा, 26 नोव्हेंबर 1949 ला रोजी संविधान सभेत स्वीकारला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत स्विकारल्यामुळे,26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधानाने संविधानाचे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान सन्मान अमृत महोत्सवानिमित्त्याने विकास नगरातील वाय.एस.आहटे यांच्या भीमछाया समोरच्या प्रांगणात सकाळी नऊ वाजता राष्ट्रध्वज ध्वजारोहण व राष्ट्रगीत घेण्यात आले. दुपारी चार वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखीत संविधान व बुद्ध पूजन नलिनी अहाटे,माला वासनिक, गंगा नाईक,मयूरी अघम,विध्या गायकवाड, चद्रभागा मिसळे,यांच्या हस्ते पूजन व दीप प्रजोलन कार्यक्रमाचे अध्यक्ष जयकृष्ण बोरकर यांच्या शुभहस्ते पाहूण्याच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मंचावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कृत बापूराव रंगारी, किशोर आगम, निर्मला मेश्राम, डॉ.सुमेध आहटे, विष्णू तवकार, बाशित खान,दिलीप भवते, माणिकराव ढोरे सुलोचना भोयर, निलेश मोखाडे मंचावर विराजमान होते. संविधान उद्देशिकेचे वाचन अक्षरा तलवारे, रोनिका गणविर हिने केले.कार्यक्रमाच्या एशस्वि करीता सिध्दार्थ अहाटे,रामचंद्र बनसोड, सुनिल बागडे,नरेंद्र अघम,अमोल अघम यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी बौध्द उपासक, उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सूत्रसंचालन हर्षवर्धन तायडे, प्रास्ताविक अशोक देशपांडे,आभार धम्मपाल तलवारे यांनी केले.