सामाजिक
जिल्हा होमगार्ड कार्यालय येथे संविधान दिन साजरा.
यवतमाळ –यवतमाळ जिल्हा होमगार्ड कार्यालय येथे ७४ वा संविधान दिवस साजरा करण्यात आला.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतामध्ये संविधान लागू झाले त्या दिवसाचे महत्त्व अबाधित राहो याकरिता देशांमध्ये २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच २६/११ च्या मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक अमानुष लोकांचा बळी गेला या हल्ल्यामध्ये होमगार्ड मुकेश जाधव हे सुद्धा सीएसटी स्थानकावर प्रवाशांवर झालेल्या हमल्यात प्रवाशांना वाचताना दहशतवादी यांच्या गोळीबारात मुकेश जाधव हे शहीद आले. त्यांनी होमगार्ड पदावर कार्यरत असताना अनेकाचे जीव वाचविले.त्या अनुषंगाने जिल्हा होमगार्ड कार्यालयामध्ये श्रद्धांजली पण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थित समादेशक अधिकारी निरंजन मलकापूर प्रदीप नागतोडे निरज राऊत, असलम तगाले, व अनेक होमगार्ड उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1