संविधान दिन निमित्त जवाहरनगर येथे २५ व २६ ला विविध कार्यक्रम
जवाहरनगर :- संविधान दिन निमित्त.आयुध निर्माणी जवाहरनगर ( भंडारा) वसाहत परिसरातील मेन मार्केट जवळील मल्टीपरपज सांस्कृतिक सभागृह ( एम पी.हॉल ) येथे २५ व २६ ला
संविधान दिन उत्सव समिती, समता सैनिक दल आणि डेमोक्रेटिक मजूर युनियन, आयुध निर्माणी, भंडारा. च्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२५ नोव्हेंबर च्या सायंकाळी ६ वाजता
“अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दडपशाही हे एक पाऊल हुकूमशाहीकडे ” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.या चर्चासत्राचे उद्घाटक आयुध निर्माणी महाव्यवस्थापक सुनिल सप्रे मुख्य मार्गदर्शक वरिष्ठ न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई.चे बी.जी.कोळसे पाटील,
कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष डॉ. भास्कर कांबळे, यांचे उपस्थितीत वरिल विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
२६ नोव्हेंबर चे सकाळी ११ वाजेपासून महिला आणि पुरुष गटासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची कारणे या विषयावर प्रश्न व त्याचे उत्तरे तर. ११ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता संविधानावर आधारित प्रश्न व त्याचे उत्तरे या विषयावर प्रश्न मंजुषा स्पर्धा, संध्याकाळी ६ वाजतापासून “द ब्लास्ट” या संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे वरील कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन आजोजक संविधान दिन उत्सव समिती, समता सैनिक दल आणि डेमोक्रेटिक मजूर युनियन, आयुध निर्माणी, भंडारा. च्या कार्यकर्त्यांनी संयुक्तिक पणे केले आहे
…………..