ब्रेकिंग न्यूज

नॅशनल पार्क मधील वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा  मृत्यू

Spread the love
मुंबई / नवप्रहार मीडिया 

            कुटुंबीय आणि इतर लोकांसोबत झाडाची छटाई आणि ती तोडण्यात व्यस्त असलेल्या तरुणावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना कॉर्बेट नॅशनल पार्कचा ढिकाला झोन येथे घडली आहे. तरुणाचे वय 22 वर्ष असून तो मूळचा नेपाळ च रहिवासी आहे.त्याचे नाव शिवा असल्याची प्राथमिक माहिती आहे.

शिवा विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कुटुंबातील 10 सदस्यांसह झाडे तोडत होता. अचानक वाघाने शिवावर हल्ला केला. शिवाचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय आणि विभागाचे कर्मचारी त्याला वाचवण्यासाठी धावले. पण त्याचा काही फायदा झाला नाही

वाघाची डरकाळी ऐकून लोक मागे सरले आणि त्यांनी आरडा-ओरडा केला. घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी वाघाला हुसकावून लावण्यासाठी हवेत दोन ते तीन राऊंड गोळीबार केला. यानंतर वाघ शिवाला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून जंगलात पळून गेला. कुटुंबीय आणि विभागीय कर्मचाऱ्यांनी शिवाला रामनगरच्या शासकीय रुग्णालयात नेले, परंतू तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

यापूर्वी खतीमा येथील सुरई जंगल परिसरात वाघाने वृद्ध महिलेवर हल्ला केला होता. ही महिला गवत गोळा करण्यासाठी जंगलात गेली होती. त्यानंतर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले.


What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close