ब्रेकिंग न्यूज

बस दरीत कोसळली : 25 प्रवाश्यांचा मृत्यू 

Spread the love

250 फुटावरून बस दरीत कोसळली, कारण अज्ञात

श्रीनगर / नवप्रहार मीडिया 

       जम्मू – काश्मीर मधील डोडा भागात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी आहेत. ही बस 250 फुटांवरून दरीत कोसळली आहे. अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नसले तरी अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात हलविण्यात येत आहे. 

हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याचं कारण अजून समजू शकलं नाही. तर प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून ही मोठी दुर्घटना घडली आहे. जम्मू-काश्मीरमधील डोडा भागात प्रवाशांनी भरलेली बस अचानक खोल खड्ड्यात पडल्याने गोंधळ उडाला.जम्मू-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी एक बस खोल दरीत कोसळली, त्यात किमान २५ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बसमध्ये 50 प्रवासी होते असं सांगण्यात येत आहे. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

साधारण ही बस 250 मीटर खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही ट्विट करून अपघाताची माहिती दिली. मी डोडा उपायुक्त हरविंदर सिंग यांच्याशी बोललो आहे. जखमींना किश्तवाडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी काही लोकांवर पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात येत आहे. आवश्यक ती सर्व मदत घटनास्थळी पाठवली जात आहे असं जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close